*अन कुहीचा तो प्रवेशद्वार धोक्याचा*

*पंचायत समिती जवळील रस्त्याच्या मधोमध येणारा प्रवेशद्वार देत आहे अपघाताला आमंत्रण*
विशेष प्रतिनिधि- निखिल खराबे
कुही:- शहरात प्रवेश करताना शोभा वाढवी याकरिता गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर सुसज्ज प्रवेशद्वार बांधले जातात पण असाच एक प्रवेशद्वार जीवघेणा ठरू शकतो. वडोदा ते कुही मार्गाचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ह्याच रस्त्यावर मधोमध उभे असलेले प्रवेशद्वार अडसर ठरले आहे. याच रस्त्याच्या रुंदीकरिता मागील वर्षात मोर्चे , आंदोलन व निवेदन देण्यात आले होते. विशेषतः तत्कालीन माजी आमदार सुधीर पारवे यांनी तेव्हा निवेदनकर्ते व या रोड चे बांधकाम करणारी सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात सामंजस्य करून शहारालगतचा मार्ग रुंदीकरण करून देण्याची ग्वाही दिली होती पण आजघडीला रस्त्याचे बांधकाम पूर्ण होत आले असून रस्ता रुंदीकरन होण्याचे चित्र अद्याप तरी दिसत नाही हे सुद्धा विशेष.

ऐन शहरात प्रवेश करणाऱ्या नागमोडी वळणावरच अडसर असलेला हा प्रवेशद्वार अपघाताचे कारण ठरू शकतो व त्यामुळे जीवितहानी ची शक्यता नाकारता येणार नाही. सदर प्रवेशद्वार बाबत अनेकांनी निवेदन दिल्याचे कळते पण अद्यापही प्रशासन यावर काहीच केले नसून सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी आहे का असा सवाल सामान्य कुहीकर करत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज