*कोराडी महादुला येथील सिद्धार्थ नगरची दोन वर्षाची चिमुकली निघाली कोरोना पॉझिटिव्ह*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी –१४ दिवसापासून ही चिमुकली क्वारंटाईन ला लॉ कॉलेज नागपूरला होती , त्याची आज रिपोर्ट पाँझिटिव्ह आली. काही दिवसापुर्वी बिहार वरून रिर्टन आलेला युवकांला रमाई नगर महादुला येथील एका युवकाला कोरोना ची लागण झालेली होती*
*त्याच्यासोबत अनेक लोकांना नागपूरला क्वारंटाईन करण्यात आलेले होते. सर्वांचे जसजसे दिवस संपत असतानी अचानक दोन वर्षाच्या चिमुकली चा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने महादुला सिद्धार्थ नगर परिसरात खळबळ उडाली. त्याचप्रमाणे*
*आज 26 लोकांना कोरोणा मुक्त म्हणून त्यांना आप आपल्या घरी पाठविण्यात आले. नगरपंचायत महादुला चे मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार आपल्या ताफ्यासह सिद्धार्थनगर महादुला येथे*
*जाऊन संपूर्ण परिसर सील करून त्या भागात सँनिटायझर करण्यात आलेले आहे. दिवसे न दिवस महादुला परिसरात कोरोना*
*पाँझिटिव्ह रग्ण आढळत असून महादुला गावाच्या लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे*.
Maharashtra News Media सच की आवाज