शाळा सुरू करण्याच्या चर्चेवर एका पालकाने विचारलेले प्रश्न *शाळा सुरू करता ना मग…* *खालील पैकी ऐका जरी प्रश्नाचे उत्तर मिळाले की नक्की शाळा सुरू करा…*

शाळा सुरू करण्याच्या चर्चेवर एका पालकाने विचारलेले प्रश्न

*शाळा सुरू करता ना मग…*

*खालील पैकी ऐका जरी प्रश्नाचे उत्तर मिळाले की नक्की शाळा सुरू करा…*

 

विशेष प्रतिनिधि-मुजम्मील शेख

1) कोरोनावर खात्रीशीर औषध सापडले आहे का ?

2) लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का ?

3) प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल…पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विद्य़ार्धी दाटीवाटीने बसविले जातात.. त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील…त्या कशा उपलब्द करणार ?

4) शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार ?

5) मधल्या सुट्टीत टाँयलेट मध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय ?

6) जिथे शहाणे माणसे ऐकत नाहीत… तिथे लहान मुले ऐकतील का ?

7) मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते…लहान मुले सांगु शकतील का ?

8) सर्व व्यवस्थित आहे हे दाखविण्यासाठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?

9) या तीन महिन्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळुन पाहीलेले आहे…तरी ते शाळेत पाठवतील का ?

10) प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?

11) पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?

12) शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील ?

13) *मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा.. लोकसभा व विधानसभा चालु करुन कोरोना संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणे जास्त योग्य वाटत नाही का ?*

14) स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील ?

15) उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला व्हायरसची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना क्वारांटाईन करावे लागेल. शिक्षकांना हि करावे लागेल.

16) क्वारांटाईनकरीता आपल्या मुलाला /मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल.

17) बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा 2 अपत्ये आहेत ,जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार ?

*18) शिक्षण महत्त्वाचे की जीवन? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?*

19) प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का ?…

*यापैकी कोणाचे उत्तर हो म्हणुन आहे*…?

*याबाबत विचार अवश्य व्हावा*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …