*पोलीस उपनिरीक्षक व त्याचा खाजगी हस्तक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात* *तीन हजार रुपये लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक*

*पोलीस उपनिरीक्षक व त्याचा खाजगी हस्तक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*


*तीन हजार रुपये लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक*

 

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः पोलीस उपनिरीक्षक सह खाजगी इसमावर लाचलुचपत विभाग नागपूर चे अधिकार्यांना तीन हजार रुपये स्विकारतांना दोघांना रंगेहाथ जेरबंद केल्याच्या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली*


*मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन सावनेर येथील पोलीस उपनिरीक्षक निशांत परमानंद जुन्नरकर वय 40 वर्षे व सागर नंदकिशोर गजरे वय 23 वर्षे खाजगी इसम राहणार सावनेर यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार हे मुक्काम पोस्ट कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून ते दारू विक्रीचा धंदा करतात तक्रारदार हे सामने इथून आयबी कंपनीचे दारू विकत घेऊन कळमेश्वर येथे नेत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक निशांत परमानंद जुनोंनकर यांनी तक्रार दारावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करण्यासाठी रुपये तीन हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना पोलिस उपनिरीक्षक निशांत परमानंद जुनोंनकर यास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लास्ट लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली असता पोलीस निरीक्षक श्रीमती संजीवनी थोरात यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून सापडत कारवाईचे आयोजन केले*


*त्यामध्ये दिनांक 12-जुन 2020 रोजी पडताळणी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक निशांत परमानंद जुनोंनकर यांनी तक्रारदारास कंपनीचे दारू सावनेर येथून खरेदी करून कळमेश्वर येथे नेण्यास कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याकरिता तीन हजार रुपये लाचेची मागणी करून क्रमांक दोन सागर नंदकिशोर गजरे खाजगी यांचे हस्ते कुणाल धाबा जवळ नागपूर रोड सावनेर जिल्हा नागपूर येथे चारचाकी वाहनांवर स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले*


*पोलीस उपनिरीक्षक निशांत परमानंद जुनोंनकर व सागर नंदकिशोर गजरे खाजगी इसमा असे दोन्ही विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर जिल्हा नागपूर येथे 7/7 अ. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजेश दूधलवार अँटी करप्शन ब्युरो चे नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजीवनी थोरात पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल गीते,नापोशी अचल हरगुडे प्रभाकर बले,मपोशी रेखा यादव निशा उमरेडकर चालक नरेंद्र चौधरी व हवा राजेश बनसोडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर हे करीत आहेत*

*लाचलुचपत विभागाच्या आकस्मिक घडलेल्या या कारवाई मुळे दोषींवर अपेक्षित कारवाई झालीच परंतू त्यामुळे जबर धडकींच बसल्याचे चित्र आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …