*मारोती सुजुकी रिट्झ वाहन चालकाचे गाडीवरील नियंञण सुटल्याने गाडी पलटी* *तरुणी चा जागीच करुण अंत*

*मारोती सुजुकी रिट्झ वाहन चालकाचे गाडीवरील नियंञण सुटल्याने गाडी पलटी*

*तरुणी चा जागीच करुण अंत*

रामटेक प्रतिनिधि- ललित कनोजे

रामटेकतुमसर महामार्गावर दुपारी एक वाजता च्या सुमारास हाॅटेल शिकाराजवळ मारोती सुजुकी रिट्झ कार चालकाचे नियंञण सुटल्याने कारमधील तरुणी चा जागीच मुत्यु झाला.
सद्या राज्यात व नागपूर शहरात कोरोना संक्रमण सुरु असतांना मागिल दोन अडीच महीण्यापासुन शहरात व ग्रामिण भागात लाॅकडाऊन असतांना काही दिवसांपुर्वीच शहर व ग्रामिण भागात शिथिलता दिल्या मुळे शहरातील काही पर्यटन प्रेमी रामटेक परीसरात पर्यंटनाकरीता कोरोना संक्रमनाची पर्वां न करता फिरायला येत अाहेत. अाज दि.13/06/2020ला नागपुर शहरातील सचिन हरिभाऊ धांडे वय ३३ वर्षे रा. भरतनगर नागपूर हा अापली मैत्रीण नितु सुरेशसिंग चौव्हान वय २४ वर्षे रा. भवानी मंदीर मागे पारडी नागपुर , हे मारोती सुजुकी रिट्झ गाडी क्रमांक एम .एच.31 डी.सी. 3533 या चारचाकी गाडीने दोघेही रामटेक येथिल खिंडशी जलाशय येथे फिरायला अाले होते.व नागपुरला परत जात असताना रामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गा चे चौपदरीकरणाचे काम सुरु असुन रस्ता खडबडीत झाला.रात्री पडलेल्या पावसामुळे हा रस्ता जास्तच खराब झाला अाहे. कार चालक हा भरघाव वेगात कार चालवत होता.

गाडी वेगात व खराब असल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंञण सुटले व गाडी पलटी झाली. गाडी पलटी खात एका मोठ्या दगडावर पलटली व नितु ही डोकावर दगड लागल्याने गंभीर जखमी होवून जागीच मुत्यु पावली. घटनेची माहीती मिळताच पोलीस निरिक्षक दिलीप ठाकुर यांनी घटना स्थळी दाखल होऊन मृतक नितु चा मृतदेह उतरीय तपासणीसाठी पाठविण्यात अाला. कारचालक सचिन हरीभाऊ धांडे यांच्या विरोधात कलम २७८, ३०४ , अ , मो.वा.का कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करुन चालकास ताब्यात घेतले. असुन पुढिल तपास पुलीस स्टेशन रामटेक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत अाहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …