*४ दिवसातच बातमी चा इफ़ेक्ट*
*अखेर रेवराल-खरबी कालव्याच्या कामाला सुरुवात*

*महाराष्ट्र न्युज मीडीया चा प्रभाव*
*अखेर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पाणी मिळावा यासाठी शेतकऱ्यांना रेवराल-खरबी या कालव्या मधुन पाणी शेतकऱ्यांना मिळत असते. परंतु तालुक्यातील धानला शिवारातील रेवराल कडून खरबी मार्गे जाणारा पाण्याच्या कालव्या वरील एक सिमेंटचा बंधारा फुटल्याने या फूटलेल्या बंधाऱ्यामुळे धानला परिसरातील काही शेतकऱ्यांची कमीत कमी दोनशे एकर शेती धोक्यात येण्याची शक्यता बळावली होती. याच संबधित बातमी महाराष्ट्र न्युज मीडीया ने दि ९ जून रोजी प्रकाशित केल्याने अखेर संबंधित विभागाणे याकडे त्वरित लक्ष वेधून अखेर बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी सुद्धा येथील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु या कड़े अनेकदा शेतकऱ्यांनी पत्र देवून सुद्धा ही समस्या सोडवण्यात आली नव्हती. त्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे दिसत होते.
धानला शिवारातून जाणारा मोठा पाणी जाण्याच्या कालवा आहे. याच कालव्यावरील एका ठिकाणी सीमेंट चा बंधारा फूटलेला होता. हा बंधारा फुटल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी न थांबता सरळ तो पानी निघून जाईल असे चित्र दिसत होते. पाणी न थांबल्यास येथील 200 एकर शेती पीक धोक्यात येणार असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असते.

जर बंधाऱ्याची दुरुस्ती न झाल्यास शेतकरी मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर महाराष्ट्र न्युज मीडीया ने बातमी प्रकाशित करताच अखेर या ठिकाणी पोखल्याण्ड च्या सहाय्याने कामाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र न्युज मीडीया चे आभार मानले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज