Breaking News

*दुचाकी वाहनावरुन अवैध दारु परिवहन करणाऱ्यास अटक*

*दुचाकी वाहनावरुन अवैध दारु परिवहन करणाऱ्यास अटक*

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
*वरोरा: 19जून2020 स्थानिक शेगाव बु येथील पोलिसांनी दुपारच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव हद्दित येत असलेल्या पाचगांव-पिजदुरा या मार्गावर अवैध दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.असता सापळा रचुन ए.सी.पी. अंकुश तारे यांच्या मार्गदर्शना खाली येथील ठानेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सदर या मार्गावर बंदोबस्त ठेऊन विशेष पाळत ठेवली असता एका दुचाकी वाहनांमध्ये 3 पोती देशी दारू असल्याचे तपासाअंती दिसून आले.*


*आरोपी भीमराव शामराव मंनेकर राहणार टेमुर्डा व आदेश धनराज घोड़ाम राहणार टेमुर्डा यांच्या कडून 3 पोती मधून 800 नग देशी दारू 90ml एकूण रक्कम 80 हजार रु ची व एक MH 29 – AP 8458 या क्रमांकाची दुचाकी गाडी किमंत 20 हजार असे एकूण 1 लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात शेगाव पोलिसांना यश मिळाले. सदर ही कारवाई पोलीस ठाण्याचे ठानेदार सुधीर बोरकुटे , अशोक शिरसागर , निकिता रासावर , देवा डुकरे , यांनी केली आहे.*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …