Breaking News

*शासन सेवेमध्ये समायोजन करण्याची मागणी* *शासन दरबारी उपेक्षाच* *कांत्रटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचे चवथे चरण*

*शासन सेवेमध्ये समायोजन करण्याची मागणी*


*शासन दरबारी उपेक्षाच*


*कांत्रटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचे चवथे चरण*

सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर
सावनेर-  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे नियमीत शासन सेवेमध्ये समायोजन करीता 15/5/20 पासून राज्यात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून आंदोलनाचा चौथा व अंतिम टप्पा कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे याचे औचित्य साधून सावनेर तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी दि 15/6/20 पासून ग्रामीण रुग्णालय व प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे कामबंद आंदोलन सुरू केले आहे देशात व राज्यात कोविड 19 च्या महामारी मधे कंत्राटी औषधी निर्माता आरोग्य सेविका युद्ध स्तरावर काम करीत अवरीत सेवा देत आहेत रुग्णालयात अखंड सेवा देत असून सुद्धा शासन दरबारी कोणतीच दाखल घेतली जात नाही याचं सेवेत असणाऱ्या नवीन नियुक्ती कर्मचारी यांना अधिक मानधन दिल्या जाते परंतु जुन्या कर्मचारण्या जे 8 ते 10 वर्षे कंत्राटी पदावर काम करूनही तुटपुंजे मानधन दिले जाते सध्या कोविड 19 या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत आणि सवयीप्रमाणे कंत्राटी कर्मचारी च योध्यच्या भूमिकेत दिसत आहे तरीही शासन दरबारी कुठलीही दखल घेत नसल्याने कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काम सुरू ठेऊन टप्याटप्याने आंदोलन केले परंतु शासनाने लक्ष न दिल्याने नाईलाजाने कठोर पाऊल उचलून कामबंद आंदोलन सुरू करावे लागले आहे याचं पर्शवभूमीवर दि 19/6/20 ला ग्रामीण रुग्णालय व प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे काम बंद आंदोलन व प्रदर्शन केले राज्यात जर आणिबाणी ची स्थिती निर्माण झाली तर त्यास शासन जबाबदार राहील असे कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कंत्राटी कर्मचारी औषधी निर्माता श्री प्रणय कोरडे , सौ आरती श्रीसागर,आरोग्य सेविका ममता चंदनबटवे,स्वाती देशमुख ,उर्मिला नारवरीया,मंजुषा भगतवार,प्रतिभा लांजेवार,सुनीता रेवडे इतर कर्मचारी संपात सहभागी होते

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …