*गोगावजवळ झायलो गाडीचा भीषण अपघात; एक जण ठार, दुसरा गंभीर*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली: नजीकच्या गोगाव गावाजवळ झायलो गाडी झाडावर आदळल्याने एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक 17 जून ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. भिमराव भानू तुमरेटी(३५) रा.ताडगुडा(हल्ली मु.गडचिरोली)असे मृताचे नाव असून, अभिजित बाबूराव मडावी(२५) रा.विवेकानंदनगर हा गंभीर जखमी झाला आहे.
भिमराव तुमरेटी व अभिजित मडावी हे एमएच १४-सीएक्स ६००३ क्रमांकाच्या झायलो कंपनीच्या गाडीने गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जात असताना गोगावजवळच्या डांबर प्लांटजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पळसाच्या झाडावर आदळली. यात दोघेही जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे भिमराव तुमरेटी यास डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनी दिली.
Maharashtra News Media सच की आवाज