Breaking News

*एक जण कोरोना पॉझिटीव्ह, तर दोघे कोरोनामुक्त*

*एक जण कोरोना पॉझिटीव्ह, तर दोघे कोरोनामुक्त*

गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोलीचामोर्शी तालुक्यात एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला, तर दोन जण आज कोरोना आजारातून बरे झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १० झाली आहे.

कोरोनाबाधित आढळलेला २९ वर्षीय युवक पालघर येथून गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर त्याला आष्टी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काल(ता.१७) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त अहवालात तो कोरोनाबाधित आढळून आला. दुसरीकडे, आज गडचिरोली व आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३ वर पोहचली असून, ४२ जण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या केवळ १० सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …