*पावसाच्या आगमनाने संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्यांची पेरणीला सुरवात तर शेत मजुरांच्या चेहऱ्यावर खुशीची लाट*
*संग्रामपुर तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर मूग व कपाशी पेरणीस सुरवात केली आहे.*
बुलढाणा प्रतिनिधी-नंदकिशोर शिरसोले
संग्रामपुर –परिसरात गेल्या आठवड्यात तीन ते चार वेळा चांगला पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरवात केली आहे. काही भागांत पाऊस कमी तर काही भागात जास्त पाऊस पडल्याने पेरणी कमी-जास्त प्रमाणात सुरू आहे.
जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाल्यामुळे मृग नक्षत्रामध्येच पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. संग्रामपूर तालुक्यात मागील आठवड्या पासून मान्सूनच्या पावसामुळे. तालुक्यातील काही शेतकरी मशागतीस वेग देत आहेत. तर काही हात लागवन, पेरणीस वेग देत आहेत.लॉकडाऊनचा काळ असतानाही आणि अनेक बँकांनी पीक कर्जाचे अद्याप वितरण केले नसताना देखील शेतकऱ्यांनी उसनवारीने खते बी बियाणांची जुळवाजुळव करून मशागतीचे कामे पूर्ण करतांना दिसत आहेत
यावेळेस संपूर्ण लोक डाऊन असल्यामुळे गुरांचे बाजार सुद्धा बंद होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीकरिता व मशागती करिता बैलजोडी विकत घेत असतात तर कोरोना प्रादुर्भाव मुळे लॉक डाऊन असल्यामुळे गुरांचा बाजार बंदच होते,तर प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी उपलब्ध झाली नसल्यामुळे यंदा 90 टक्के पेरणी ही ही ट्रॅक्टरच्या माध्यमांन केली असून फक्त दहा टक्के पेरणी बैल जोडी तिफन माध्यमातून केले गेल्याचे चित्र दिसून येत आहे
तालुक्यातील संग्रामपुर,बावनबिर . सोनाळा ,लाडणापुर ,वरवट बकाल ,पातुर्डा , वानखेड,पळशी अशा अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत.या मुळे ग्रामीण भागातील शेतमजूरास हाताला काम मिळाल्याने, मजूराच्या चेहर्यावर आनंदी हास्य दिसत आहेत.संग्रामपुर तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. व सध्या अंदाजे 60 ते 70 टक्के पेरणी पूर्ण झाले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज