Breaking News

*नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी – खंडविकास अधिकारी राठोड*

*नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी

– खंडविकास अधिकारी राठोड*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : सध्या देशात असलेले कोरोना संकट आणि सुरू झालेला पावसाळा त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्या विषयी सतर्क राहावे असे आवाहन मौदा पंचायत समिती चे खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी केले आहे.

सध्या मौदा तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या लॉक डाऊन चे तालुक्यातील गावखेड्यातील नागरिकांनी काटेकोर पालन केले आहे. सर्व ग्रामपंचायत सचिव व कर्मचारी यांनी प्रत्येक गावात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांना दिली. सद्या पावसाळा सुरू झाला असून या काळात विविध साथीचे आजार डोके वर काढू शकतात. त्याला अनुसरून गावातील नाले सफाई, पिण्याचे शुद्ध पाणी व आरोग्य तपासणी याविषयी सर्व ग्रामपंचायत सचिवांना सूचना देण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

नागरिकांनी सुध्दा या बाबतींत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे तसेच नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आव्हान राठोड यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …