Breaking News

*अडेगांव येथे करंट लागून एका बैलाचा मृत्यू* *ऐन हंगामात शेतकऱ्यावर मोठे संकट* *विज वितरण कंपनी चा अलगर्जिपणा*

*अडेगांव येथे करंट लागून एका बैलाचा मृत्यू*

*ऐन हंगामात शेतकऱ्यावर मोठे संकट*

*विज वितरण कंपनी चा अलगर्जिपणा*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : आधिच कोरोनामुळे जनजीवन व्यथित झालेल्या पार्श्र्वभूमीवर कसेबसे शेतकरी आपल्या शेती मशागतीच्या कामाला लागलेले आहेत. अशात एखाद्या शेतकऱ्यांचा धुरंचा बैल मरणे म्हणजे त्या शेतकऱ्यांचा एक हात तुटल्यासाखा होतो.

असाच प्रकार मौदा तालुक्यातील अडेगांव येथे घडला. येथील शेतकरी बंडू बांते हे सारडा यांच्या शेतात भाडयाने औत नेले होते. दि.२० जुन रोजी दुपारची दिड वाजता च्या दरम्यान न्याहारी करिता औत सोडण्यात आले. बैल चरत असतांना पडलेल्या जिवंत विद्युत ताराला एका बैलाचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. त्या बैलाची अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये होती.

अचानक पन्नास हजार रुपये किमतिचा धुरंचा बैल करंट लागून मेल्याने शेतकरी बंडू बांते यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांची मागणी आहे.

विज वितरण कंपनी चा निष्काळजीपणा

मागील आठवड्यात वादळ वार्याने या येथिल पोलवरिल विज तारा तुटल्या होत्या. याची माहिती शेतकऱ्यांनी अरोली सब डिव्हिजन ला देण्यात आली. तात्पुर्ती सोय म्हणून विज वितरण विभाने करंट निकामी करुन तार गुंडाळून एका पाटात ठेवण्यात आले. परंतू (दि.१८)च्या रात्री आलेल्या पावसाने विज पोल वाकल्यामुळे गुंडाळून ठेवलेल्या तारांना स्पर्श झाल्याने त्याही तारा प्रवाहित झाल्या याची कुणालाही चुणूक नव्हती. आणि त्यातूनच शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले. याबाबत अरोलिच्या सब डिव्हिजन ला काँल केले असता लागत नव्हते.

झालेल्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई संबंधित विभागाने तात्काळ देण्यात यावी. व अशा प्रकारच्या घटना घडू नये याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी.

अनिल बुराडे,
मौदा पंचायत समिती सदस्य, अडेगांव

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …