Breaking News

*पतंजलि युवा भारत, नागपूर जिल्हा च्या वतीने आयोजित 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीपणे संपन्न झाले*

*पतंजलि युवा भारत, नागपूर जिल्हा च्या वतीने आयोजित 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीपणे संपन्न झाले*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपूरपतंजलि युवा भारत नागपूर जिल्हा च्या वतीने सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस, भारत सरकारच्या, आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार आयोजित करून कार्यक्रमाचे संयोजक निखिल भुते यांनी ऑनलाइन योगा प्रात्यक्षिक व प्राणायाम चे थेट प्रेक्षपण करून जागतिक योग दिनाची, योग साधक व नागरिकांना आयुर्वेदिक काढा आणि निरोगी रहाण्याची माहिती देण्यात आली.
देशभरात कोविंद विषाणूचा वाढता प्रभाव पहाता.घरातील योग, ही थिम घरातील कुटुंबासमवेत, विश्व योग दिवस साजरा करण्याचे आव्हान भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगगुरू स्वामी रामदेव जी महाराज यांनी केली होती.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, कार्यक्रमाचे संयोजक निखिल भुते, युवा प्रभारी पंकज बांते, विदर्भ फार्मसी असोसिएशनचे विक्रांत चिलाटे, माजी सैनिक मोहन वैरागडे, योगशिक्षीका अश्विनी भुते,भावना चौधरी, भाग्यश्री भुते, सुनंदा भुते यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …