Breaking News

*एमपीएससी उत्तीर्ण मोहनिष चा सत्कार*

*एमपीएससी उत्तीर्ण मोहनिष चा सत्कार*

वरोरा प्रतिनिधी – मुजम्मील शेख 


*MPSC परीक्षेत यश प्राप्त करणारे मोहनिष शेलवटकर यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस तर्फे श्री छोटू भाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले*

*वरोराआनंदवन चौक येथील रहिवासी मोहनिष.शेलवटकर यांनी सुरुवातीला रात्रंदिवस मेहनत घेऊन आई वडिलांचे संस्कार व आशिर्वाद घेत इंजिनीयर ची पदवी प्राप्त केली व त्यानंतर शेतकरी शेतमजूर निराधार गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचे विचार नेहमी त्यांच्यासमोर येत असल्याने त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षेत भाग घेऊन महाराष्ट्रात 40 वा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.आणि आता ते तहसीलदार म्हणून येत्या काही महिन्यात कार्यरत राहणार आहे आणि सर्वसामान्य माणूस शेतकरी शेतमजूर कामगार निराधार अशा लोकांना त्यांनी मदत करावी या उद्देशाने वरोरा भूषण ठरलेले श्री शेलवटकर यांचे आज दिनांक 21 जून ला त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या वडिलांसह त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस असंघटित कामगार च्या वतीने जिल्हा अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा श्री छोटूभाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित काँग्रेस असंघटित कामगार जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब भाई गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्र रूपलाल जी कावडे विनोद कुंभारे राहुल भोयर योगेश कोडापे माणिक शेंडे या प्रसंगी सर्वांनी उपस्थिती राहून अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …