Breaking News

*बोगस बियाने व खत बिक्री करुन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कंपनी व कृषी केंद्र  वर कडक कार्यवाही करा* *अन्यथा आंदोलन उभारू* -छोटू भाई शेख

*बोगस बियाने व खत बिक्री करुन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कंपनी व कृषी केंद्र  वर कडक कार्यवाही करा*

*अन्यथा आंदोलन उभारू* छोटू भाई शेख

वरोरा प्रतिनिधि :- मूजम्मिल शेख

चंद्रपुर– *उपविभागीय अधिकारी मा.शिंदे यांना निवेदन सादर करुन बोगस बीबीयाने व खत विक्री करणार्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे*
*सादर निवेदन देताना प्रतिनिधींनी साबत झालेल्या चर्चेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांनी अश्या लोकांवर कार्यवाही करण्याकरिता अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले यावेळी निवेदन सादर करताना छोटू भाई शेख जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कामगार,सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण समिती चंद्रपूर,अनिल झोटिंग उपाध्यक्ष नप वरोरा नथुजी सोनटक्के सचिन ढवस, मेश्राम वरोरा भद्रावती तालुक्यात नामांकित कंपनीच्या नावाखाली बोगस बी-बियाणे व खत विक्रीचे काम काही दलाल व दुकानदार मोठ्या प्रमाणात करीत असून यांच्या या अशा बोगस कामामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत याकडे संबंधित विभागाकडून डोळेझाक पणा होत असल्याने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचे लावलेले बियाणे उगवीले नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहेत तरी अश्या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कंपनी व दुकानदाराचे परवाना रद्द करून त्यांच्यावर कार्यवाही व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व तसेच होत असलेली शेतकऱ्यांची लूट हा काळा धंदा थांबविण्याकरिता दोन तालुका मिळून अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन प्राप्त होताच वरील प्रकरणात पथक तयार करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मा. शिंदे उपविभागीय अधिकारी यांनी देऊन अधिकाऱ्यांना त्वरित निर्देश दिले*

यावेळी निवेदनाची प्रत

१) माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार साहेब मंत्री मरा मुंबई तथा पालकमंत्री चंद्रपूर

2) माननीय खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेब चंद्रपूर आर्नी लोकसभा मतदारसंघ 3) माननीय तालुका कृषी अधिकारी वरोरा

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …