*आमदारांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास*
*मौदा पंचायत समितीची आढावा बैठक संपन्न*
*अपूर्ण कामे पूर्ण करा आमदार सावरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : मौदा तालुका पंचायत समिती ची आढावा बैठक पंचायत समिती सभागृहात दि.२२ जुन रोजी कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेला नागपूर जिल्हा परिषद चे कृषि सभापती तापेशवर वैद्य, जि.प.सदस्य कैलास बरबटे, योगेश देशमुख, राधा अग्रवाल, शालिनी देशमुख तसेच मौदा पंचायत समिती सभापती दुर्गा ठवकर, उपसभापती रक्षा थोटे, सर्व पं.स. सदस्य अनिल बुराडे, स्वप्निल श्रावनकर, खेमराज चाफले, ज्ञानेश्वर चौरे, दिपक गेडाम, वंदना सिंगनजुडे, पुनम तिघरे, किर्ती पायतोडे तसेच तहसीलदार प्रशांत सांगळे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, तालुका कृषी अधिकारी रविकांत वासनिक, पं.स.कृषी अधिकारी संध्या मोहकदंम, विस्तार अधिकारी चरणदास घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुपेश नारनवरे, विस्तार अधिकारी सुरेश रामटेके, शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, विज वितरण कंपनी चे उपकार्यकारी अभियंता प्रफुल्ल वैद्य, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आरोग्य, कृषी, घरकुल, रस्ते, बांधकाम, कर्जमाफी व पुरवठा, खरीप हंगाम, कोविड-१९, विद्युत पुरवठा इत्यादी विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध विभागात असलेले अपूर्ण कामे पूर्ण करा, साथीच्या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रत्येक गावात राबवा, गावात स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
Maharashtra News Media सच की आवाज