*खराडा पुनर्वसन येथील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालया करिता निवड*
*खराडा जि.प. शाळेचा दुर्गेश चन्ने चे सुयश*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : मौदा तालुक्यातील खराडा पुनर्वसन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या दुर्गेश नरेश चन्ने याने इयत्ता सहावीत प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय निवड परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले. त्याला शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर रेवतकर, चंदा भजने, स्मृती हिरेखण, मंगेश कांबळे, यांनी मार्गदर्शन केले. दुर्गेश ने मिळविलेल्या या यशासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच रूपचंद केवट, उपाध्यक्ष सिंधू कुलरकर, तसेच संपूर्ण व्यवस्थापन समिती, उपसरपंच चंदन कुलरकर, ग्रामपंचायत सदस्य धनपाल बोरकर, प्रफुल भोयर, निशा देशमुख, चेतना देशमुख, विद्या भोयर, मंगला भोयर व समस्त शिक्षक वृंद यांनी दुर्गेश ला भविष्यातील उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वभावातील नम्रता, आज्ञाधारक वृत्ती, आणि अपार कष्ट करण्याची तयारी या गुणामुळे घरच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीवर मात करत दुर्गेश ने या परिक्षेत यश मिळविले असे त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक मंगेश कांबळे यांनी सांगितले.
खराडा पुनर्वसित गावात असलेल्या या शाळेची पटसंख्या २०१६-१७ साली २६ एवढी होती. आता ती आज वाढून सन २०२०-२१ या वर्षी ७० हून अधिक एवढी झाली आहे. इतर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या सतत कमी-कमी होत असताना मात्र खरडा पुनर्वसन शाळेची पटसंख्या चा आलेख मागील चार वर्षापासून सतत वाढत आहे. याचे कारण म्हणजे या शाळेने भौतिक सुविधांच्या व गुणवत्तेच्या बाबतीत भरघोस प्रगती केलेली आहे. शाळा डिजिटल झालेली असून शाळेत दोन संगणक संच, प्रोजेक्टर इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड आहेत. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरो चे पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज