Breaking News

*ट्रकची स्कुटी ला धडक स्कुटी सवार महीलेचा जागीच मृत्यु*

*ट्रकची स्कुटी ला धडक स्कुटी सवार महीलेचा जागीच मृत्यु*

रामटेकरामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गावर शिकारा हाॅटेल समोर बारब्रिक कंपनीचे महामार्गाचे काम सुरु असुन त्याच कंपनीच्या सिमेंट मिक्सर ट्रकने स्कुटीस्वार महीलेला जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला.
मंगला कैलास बर्वे वय . ४८ रा. शास्ञी वार्ड,मोठी गडपायरी रामटेक हि महीला एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह काचुरवाही येथे काळजीवाहक या पदावर कार्य कार्यरत होती.नेहमी प्रमाणे ती रामटेक ते काचुरवाही येथे जाणे येणे अापल्या स्कुटी मेस्ट्रो गाडी क्रंमाक एम .एच. ३१ एफ.के १७३० ने पाच वाजताच्या सुमारास कामावरुन परत येत असतांन मागुन येणारा सिमेंट मिक्सर ट्रॅक क्रंमाक सी. जी. ०४ जे. डी ४४७१ ने जोरदार धडक दिल्याने स्कुटीस्वार मंगला चा जागी मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर अापल्या स्टाफ सह घटना स्थळी दाखल होऊन मृतक महीलेचे पार्थिव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात अाले.असुन ट्रक चालका विरोधात कलम २७९ ,३०४, अ मो.वा. का १८४ अन्वेय गुन्हा दाखल करुन पुढिल तपास एपीअाय शेंडगे करीत अाहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …