Breaking News

*शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार* *गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा*

*शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार*

*गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा*

 

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

नरखेड –  काटोल विधान सभा क्षेत्रा चे लोकप्रिय नेता
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अशी घोषणा केली की या पेरणी च्या कठीण परिस्थिती जर शेतकऱ्यांना बँका ने कर्ज दिले नाही तर बँकेवर फौजदारी गुन्हे दाखल होईल असे म्हटले या वर्षी कोरोनाचे संकट व टोळाधाडीचे संकट व शासनाने अजून पर्यंत कापूस खरेदी केला नाही .अशा अनेक संकटाच्या विचार करुन शेतकऱ्यांना चे पाठीशी ग्रहमंत्री अनिल देशमुख खंबिर पणे उभे आहे.तसेच शेतकऱ्यांना साठी जुन महीना अतिशय महात्त्वाचा आहे.

या वेळला पेरणीला भरपूर पैसा लागतो म्हणून पैसा कमी पडु नव्हते म्हणून सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळात मदत करणे महात्तावाचे त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक नॅशनललाईज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक नॅशनलाईज बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …