Breaking News

*शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली पण चक ते उगवलेच नाही* *शासनाने योग्य आर्थिक मोबदला दयावात अशी शेतकऱ्यांची मागणी*

*शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली पण चक ते उगवलेच नाही*

*शासनाने योग्य आर्थिक मोबदला दयावात अशी शेतकऱ्यांची मागणी*

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

नरखेड़वर्तमान परिस्थिती पाहता शेतकरी हा अनेक संकटाने समस्या च्या चक्रवीवात भयानक सापडला आहे.कोरोनाचे संकट सुरुच आहे.त्यात टोळाधाडीचे संकट आले नंतर आवकाडी पाऊल .नंतर कापसाचे कापूस उत्पादन घरी आले पण खाजगी व्यापारीयाने कमी भावाने विकत घेतला.तर काही शेतकरी यांच्या कापूस हा शासन लवकर खरेदी करेल म्हणून घरीच पडुन आहे.कसे का होईना जुन महीना सुरू झाला व पावसाने सुरुवात केली व शेतीची पेरणी सुरू झाली .काही नी कापूसाची पेरणी केली पण योग वेळेवर पाऊस येत नसले मुळे जमीन मधील कापसाचे बिज हे निघालेच नाही तर काही बिज हे जमीन वर असनारे जिवाणू खात आहे .यामुळे दुबार पेरणीची वेळ काही ठिकाणी आली आहे .तर काही ठिकाणी बोकस बियाणे निघाले मुळे पण पेरले पण उगवलेच नाही.अशी अवस्था झाली आहे.असे प्रकार हे सोयाबीन या पिका बदल पण होत आहे.

आज नरखेड तालुक्यातील सोयाबीन ची पेरणी शेतकऱ्यांनी केल्यावर ती उगवली नाही यांची काल सभापती, उपसभापती पाहणी केल्या नंतर कृषी विभाग ने आज कृषी विदयापीठ तज्ञ टीम येऊन भिष्णूर, खुशालपूर,करंजोली, जामगांव येथील शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी हे बियाणे खराब आहे असा प्राथमिक माहिती दिली. यावेळी पाहणी करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री.डॉ योगेश धार्मिक कृषी विद्याव्यत्या, श्री. महेंद्र कोल्हे महाबीज कंपनी प्रतिनिधी,श्री. निमजे उपविभागीय कृषी अधिकारी, श्री डॉ. योगराज जुमडे तालुका कृषी अधिकारी, श्री. सरोदे कृषी अधिकारी पंचायत, श्री. ठाकूर मंडळ अधिकारी, सौं. खंडार कृषीसहायक,श्री. राजेंद्र नासरे विक्रेता, श्री. गजानन नासरे सदस्य ग्राम पंचायत उपस्थित सर्व शेतकरी वर्ग होते. जर शेतकरी यांच्या पेरले पण उगवलेच नाही अशी अवस्था ज्या शेतकरी बांधवाची झाली .त्याचे शेताची पाहनी करून त्यांना शासनाने योग्य आर्थिक मोबदला दयावात अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …