*बोलेरो पीक अप गाडीमध्ये मिळाल्या १० गाय*
*कत्तल खाण्यात नेत असल्याचा संशय*
*केळवद पोलिस स्टेशन हद्दीतील घटना*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*केळवदः दि. २३/०६/२०२० रोजी रात्र पेट्रोलिंग करीत असताना गुप्त महितीद्वारे केळवद पोलिसांनी सावळी (मोहतकर) रोड वरून नागपूर पांढुर्णा हायवे कडे येत असलेल्या बोलेरो पीक अप गाडी क्रमांक एम एच ३६ ए ए २०४१ गाडीमध्ये अवैध रित्या कत्तलखान्यात नेण्याकरिता गोवंशची वाहतूक केली जात आहे.या गुप्त माहितीवरून पोउप निरीक्षक अर्जुन राठोड नपोशी रवींद्र चटप,विजय वडकी,नानुसाव राऊत गुनेश्र्वर डाखोळे यांनी पांढुर्णा नागपूर रोड येथे नाकाबंदी लाऊन तपासणी करीत असताना २३/०६/२०२० ला पहाटे ४:०० वाजता सावळी (मोहतकर) रोड वरून गाडी येताना दिसली गाडीला थांवण्यासाठी इशारा केला असता चालकाने गाडी क्रमांक एम एच ३६ ए ए २०४१ पळ काढला पोलिसांनी सरकारी गाडीने बोलेरो गाडीचा पाठलाग केला पोलिस पाठलाग करीत असल्याचे चालकाच्या निदर्शनात आले असता चालकाने तेलंगखेडी रोड नी भरधाव निष्काळजी प्रमाणे वाहन चालवत नेले तेलंगखेडी गाव पार झाल्यावर प्रेम सावजी याच्या पोल्ट्री फार्म जवळ समोरून दुसरे वाहन आल्याने बोलेरो गाडीचा चालक व सोबतचा एक व्यक्ती गाडी तिथेच सोडून पळून गेला*
*पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये १० गाई डांबून दिसल्या या इतक्या गाई छोट्याशा बोलेरो गाडी मध्ये का ? नेत आहे अशा प्रश्न पोलिसांच्या मनात आला असता ही गोवंशची वाहतूक कत्तलकरिता होत असल्याचे निदर्शनास आले*
*केळवद पोलिसांनी १० नग गाई एकूण किंमत १,००,००० रुपये व बोलेरो गाडी ८,००,००० रुपये असा एकूण ९,००,००० रुपये चा मुद्देमाल जप्त करून १० गोवंशला पुढील देखभाल व उपचारास गौ शाळेत रवाना करण्यात आले*
*वाहन चालक व सोबतच्या व्यक्ती वर केलवद अप क्रमांक १५३/२०२० कलम २७९,३४,१७९,१८४,१३४/१७७ मोवाका १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपास पो. उप. नि. अर्जुन राठोड हे करीत आहे*
*सदरची कार्यवाही मा.श्री राकेश ओला पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्रीमती मोनिका राऊत,अपर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण अशोक सरंबळकर उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्री सुरेश मट्टामी,पो उप नि अर्जुन राठोड व इतर सहकारी यांनी केली*
Maharashtra News Media सच की आवाज