*मौदा तालुक्यात खरीप हंगामाला सुरवात*
*शेतकरी लागले कामाला*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : मागील काही दिवसात मौदा तालुक्यात थोडफार पाऊस सुरू झाला. आणि शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली. त्यामुळे सर्वत्र शेत मशागतीच्या सुरवात झाली. काही सधन शेतकरी यांत्रिकीकरण तर काही शेतकरी परंपरागत पद्धतीने मशागत करीत आहे.
धान, मिरची, कापूस व सोयाबीन ही तालुक्यातील मुख्ये पिके आहेत. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांनी टिपण, फोकीव व पेरणी पद्धतीने धान लागवड केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने धान पर्हे टाकले आहे. तर काही शेतकरी समाधान कारक पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मजुरांची कमतरता लक्षात घेता अनेक सधन शेतकरी ट्रॅकटर च्या साह्याने पेरणीपूर्व मशागत करताना दिसत आहेत.
बर्याचशा शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पेर्याची मोडी झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. त्यातच अनेक शेतकरी पीककर्ज मिळविण्याच्या दृष्टीने विविध बँकेत गर्दी करताना दिसून येत आहेत. एकंदरीत तालुक्यात खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. सर्वत्र हिरवेगार वातावरण निर्माण झाले असून “पेर ते व्हा” या पक्षाचा आवाज रानावनात घुमत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज