*आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा*
*उदयनगर नागपूर येथे सहावा आंतरराष्ट्रीय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला*
नागपुर प्रतिनिधी जोत्सना इंगळे
*नागपूरः *देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगऋषी बाबा रामदेव यांच्या आपल्या घरी राहूनच योग प्राणायाम करण्याचे आवाहन तसेच पतंजली योगसमिती नागपूर यांच्या निर्देशानुसार उदयनगर येथील योगशिक्षिका सौ.माधुरी सुभाष निंबुळकर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर सोशल डिस्टंगशीन चे पालन तसेच सेनेटायझरचा वापर करीत सहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.*

*सर्व साधकांना योगाचे महत्त्व सांगत फक्त एक दिवस योग करुन चालणार नाही तर दररोज नियमित योग करुण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे निवेदन सदर आयोजनातुन करण्यात आले,या कार्यक्रमात सुभाष निंबुळकर ,प्रेमशिला जैस्वाल ,वनीता दोनाडकर ,शुभम ,सुचीता,भावना चंद्रासे इत्यादी नी योग सादरीकरणात भाग घेतला*
Maharashtra News Media सच की आवाज