Breaking News

*अल्म्युनियमच्या प्लेट चोरी करताना चोरटे पोलिसांच्या ताब्यात* *३८९२०० रु.चा मुद्देमाल जप्त* *खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील घटना* *स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*अल्म्युनियमच्या प्लेट चोरी करताना चोरटे पोलिसांच्या ताब्यात*

*३८९२०० रु.चा मुद्देमाल जप्त*

*खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील घटना*

*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*


*विशेष प्रतिनिधि खापरखेड़ा*
खापरखेडा –  पोलिस स्टेशन हद्दीतील नांदा येथील पावरमॅक प्रोजेक्ट लि.कंपनीच्या सेन्ट्रल स्टोरमधून आरोपींनी अॅल्म्युनियमच्या प्लेट चोरी करताना नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोराडी रोडवर गश्तीदरम्यान आज(बुधवारी) दुपारी २:३० वा.दरम्यान मुद्देमालासह एका आरोपीला गजाआड केले असून एका कबाडी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.आणि इतर दोन आरोपी पसार झाले.
प्राप्त माहितीनुसारताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे :-
1) भोकन्या उर्फ शुभम भगवान जाधव, वय 19 वर्ष, रा. जयभीम नगर, जुनी पोलिस चौकि कोराडी, नागपूर. (चोरी करनार)व 2) विलास गौतम बचाटे, वय 31 वर्ष, रा. इंदिरा प्रगती नगर, मछी मार्केट, महादुल्ला, नागपूर.(माल घेणार).अशी ताब्यात घेतलेल्या ची नावे असून फरार आरोपीची नावे 3) राजु उर्फ बोक्या सुरेश मेश्राम, रा. सिधार्थ नगर, कोराडी, नागपुर. 4) रवी उर्फ बिहारी, रा. मातोश्री बार जवळ, नांदा, नागपुर आहे.
गुन्हे प्रतिबंध संबंधाने नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिस गस्त करित असतांना, दुपारी 02:30 वाजताच्या दरम्यान खात्रीशीर गोपनीय माहितगारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नागपुर ग्रामीण हद्दीत चोरी करनारा एक आरोपी महादुला, कोराडी येथील परिसरात हजर आहे. अशा प्राप्त माहितीची योग्य खातरजमा करुन नमूद आरोपिस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने central store powermake project ltd, नांदा, पोलिस ठाणे खापरखेडा येथे त्याच्या आनखी तीन साथीदारासह कंपनीतील 250 किलो aluminum sheet tata s वाहनाच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. लागलीच चोरी केलेला माल एका भंगार व्यावसाईकास विकल्याचे आरोपीने कबुल केले. चोरी करणा-यास व चोरिचा माल खरेदी करनारा या दोघांस ताब्यात घेण्यात आले आहे. तर चोरी करणाराच साथीदार फरार आहे.
सदर घटनेतीलएक tata s चारचाकी वाहन क्रमांक MH 40 AN 6509, किमती 3,50,000/- रुपये. आणि एल्युमीनियम शीट 250 किलो किमती 37,500/- रू. तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले कैची व सब्बल किमती 1700/- रू.
असा एकूण 3,89,200/- रुपये किमतीचा चोरिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीना पुढिल कायदेशीर कार्यवाही करिता पोलिस ठाणे खापरखेडा येथे ताब्यात देण्यात आले आहे.सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल जिट्टावार यांचे आदेशाने पोऊपनी सचिन मत्ते, सफौ लक्ष्मिप्रसाद दुबे, हेकॉ सुरज परमार, नीलेश बर्वे, नापोशि शैलेश यादव, सत्यशील कोठारे, पोशि प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड व चासफौ साहेबराव बहाळे यांचे पथकाने पुर्ण केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …