Breaking News

*वाकेश्वर प्रकरणात विनयभंग, फसवणुक व अवैध सावकारी चा गुन्हा दाखल,आरोपी अटक*

*वाकेश्वर प्रकरणात विनयभंग, फसवणुक व अवैध सावकारी चा गुन्हा दाखल,आरोपी अटक*

विशेष जिल्हा प्रतिनिधि

भिवापुरभिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात अवैद्य सावकारी प्रकरणात महिलेला मारहाण करून शेती बळजबरीने बळकावण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भिवापूर पोलीस स्टेशनला विनयभंग, फसवणूक व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

भिवापुर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात पीडित महिलेच्या पतीची जमीन आहे. आरोपी अभय पाटील कडून पीडित महिलेच्या पतीने दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते.

 

याच प्रकारातून २० जूनला पीडित महिला ही शेतात काम करीत असताना आरोपी अभय पाटील व त्याची पत्नी प्राजक्ता पाटील हे गेले. त्यांनी पीडित महिलेला मारहाण करून शेता बाहेर काढले. हा प्रकार समोर येताच भिवापूर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४, ३५४(४),३५४ (ब),४२०, ३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९,४१(क), ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

काय होती घटना?
शिवानी (काल्पनिक नाव) असे पीडित शेतकरी महिलेचे नाव आहे. व्याजाचे पैसे, शेतीचे विक्रीपत्र आणि ताबा मिळविण्यासाठी अवैध सावकाराचा खटाटोप यातूनच ही निर्लज्जपणाचा कळस गाठणारी घटना घडली. शिवानीने दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याप्रकाराला शिवानी व तिच्या पतीने विरोध केला. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून शिवानीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. उदरनिवाहार्चे साधन हिसकले जात असल्याने शिवानीने शेतात फिरत असलेला अवैध सावकाराचा ट्रॅक्टर रोखण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान सावकाराच्या पत्नीने शिवानीला साडी खेचून अक्षरश: बेअब्रू केले. हा प्रकार सुरू असताना अवैध सावकारासह ट्रॅक्टरचालक व अन्य ५-६ पुरुष शेतात उपस्थित होते. मात्र शिवानीच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. हा सर्वप्रकार सोशल मीडिया वर वायरल झाले आहे.शिवानीच्या पतीच्या नावे तालुक्यातील वाकेश्वर येथे एक हेक्टर शेती आहे. नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेल्या शिवानीच्या पतीने तीन वर्षांपूर्वी उमरेड येथील अवैध सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतली होती. व्याजाची वाढती रक्कम देण्यासाठी त्यांनी अनेकदा सावकाराचे उंबरठे झिजविले. मात्र सावकाराने त्यास नकार दिला. अद्यापही पीडित शेतकरीच शेताची वाहीजुपी करीत आहे. अशात गत २० जून रोजी सावकार व त्याच्या पत्नीने शिवानीच्या शेतात दाखल होत, ताबा मिळविण्यासाठी उपद्व्याप केला. यावेळी सावकाराच्या पत्नीच्या नावे आपल्या शेताचे विक्रीपत्र पाहून शिवानीला धक्का बसला. याप्रकरणी १५ जून रोजी शिवानीने पोलिसात तक्रारही नोंदविली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …