*योगश्च चित्तरुपेन*
*भाग 2*
*प्रस्तुतकर्ता दिपक येवले*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल हे जाणीवपूर्वक क्रमशः लेखामध्ये पाहू.*
*प्राणायाम करणे प्रत्येक व्यक्तीस का आवश्यक आहे?*
आजची जागतिक वातावरण परिस्थिती जर, आपण वरवर करता पाहली, तर आपल्या असे लक्षात येते की, आजचे जे एकंदरीत वातावरण आहे. ते अतिशय प्रदूषित आहे. कारण वातावरणामध्ये जी शुद्धता पाहिजे, ती आता बर्याच कारणांमुळे कमी कमी होत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर असलेले असंख्य लोक किंवा, आपण आपल्याकडे जर पाहिले तर, असे लक्षात येते की या पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी हा निरोगी नाहीच. कारण आजच्या युगामध्ये त्याचे राहणीमान, खानपान, आचरण, विचरण या सर्व गोष्टींमध्ये पूर्वीच्या तुलनेत खूप मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला निरनिराळ्या आजाराने जखडून ठेवले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ऍसिडिटी या प्रकार चा आजार आहे, तो प्रत्येक मनुष्याला थोड्या किंवा जास्त प्रमाणात आहेच. हा आजार म्हणजे भावी जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक आजारांना आमंत्रण देणारा आहे.
*असे का होते? काय केल्याने आपण निरोगी राहू?*
आपल्याला खूप काही करायचे नाही. फक्त आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे. आणि जर आपण मनाशी पक्का विचार केला. तर तो आपण कुठलेही स्वतःला कारण न सांगता सहजपणे वेळ काढू शकतो. आपण एवढ्या धकाधकीचे चे जीवन जगून आपला परिवार व आपण सुखी राहण्यासाठी, आपन जीवापाड मेहनत करून पैसा कमवतो. जेणेकरून आपण व आपला परिवार सुखी राहो, आनंदी राहो एवढ्यासाठीच ना?
*पण आजच्या जगामध्ये आपण शरीराने मनाने व इतर बाबीने खरंच खुश आहोत का?*
हे आपल्याला विचार करून पाहायचे आहे. इतका जिवाचा आटापिटा करून मेहनत करून आपणास व परिवारास सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या शरीरामध्ये असलेल्या निराळ्या छोट्या-मोठ्या आजारा किंवा दुखण्यामुळे, आपल्या मधला तो उत्साह कमी होत राहतो. कारण आपल्या शरीरामध्ये काहीही कारण नसताना सुस्तपणा, नर्वस पणा, अचानक भीती वाटल्या सारखे होणे. निगेटिव्ह विचार करणे, अशा प्रकारच्या बाबी नेहमी सुरू राहतात.
*याला कारण काय? व संपूर्ण दिवस-रात्र तरोताजे राहण्यासाठी आपण कुठला प्राणायाम व आसन करायला पाहिजे, हे आपण पुढल्या लेखामध्ये पाहू.*
ही शृंखला आपल्या साठीच आहे.
Maharashtra News Media सच की आवाज