Breaking News

*नको देव राया अंत आता पाहुँ* *नरखेड तालुक्यातील शेतकरी चिंतेत* *आत्महत्या करण्याची आली त्यांच्यावर वेळ* *पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट काही ठिकाणी पक्षीच खात आहे शेतकऱ्याचे बियाणे तर काही ठिकाणी बियाणे निघालेच नाही*

*नको देव राया अंत आता पाहुँ*

*नरखेड तालुक्यातील शेतकरी चिंतेत*

*आत्महत्या करण्याची आली त्यांच्यावर वेळ*

*पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट काही ठिकाणी पक्षीच खात आहे शेतकऱ्याचे बियाणे तर काही ठिकाणी बियाणे निघालेच नाही*

बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के

बेलोनामृग नक्षत्राच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत खुशीचा माहोल निर्माण झाला होता आणि आनंदात पेरणीला सुर्वात झाली .पण निसर्गाच्या समोर शेतकऱ्यांचं काय चालणार आणि असेच झाले पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे .शेतीला बी बियाणे विकत आन्यासाठी शेत गहाण ठेऊन तर कोणी कर्ज काढून तर काही शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे दाग दागिने(सोने) गाहाण ठेवून पैसे काढले आहेत तर कोणी आपल्या परिस्थिती नुसार शेतीची पेरणी केली आहे कोणाचं कापूस विकाचा आहे तर कोणी बैल जोडी विकून शेतीची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांना पावसाने दडी मारल्यामुळे खूब सकट कोसळले आहे.त्याच्या शेतात पावसा अभावी शेतीतील पेरलेले माल मरत आहेत तर कुठे कापसाचे बियाणे (सरकी) निघालेली नाही तर कुठे
मका , स्वयाबीन तूर या सारखा माल पक्षी .रानडुकरे आणि इतर प्राणी जमिनीतून काढू काढू खात आहे. त्यामुळे शेतकरी सकाळी पासून ते सायंकाळ परनत शेतात पशू पक्षी हाकलण्यासाठी शेतात राहत आहे . पावसाळा सुरू असताना शेतकऱ्यांना उन्हाळा सहन करावा लागत आहे .

*जगाचा पालन करता आता संकटात सापडला आहे *
निघालेला माल पाऊस नसल्यामुळे मरत आहे . गरज आहे त्याला ती पावसाची आणि पाऊस हा शेतकरी राज्याची कुठली कसोटी पाहत आहे असा शेतकरी आभाळाकडे डोळे बंद करून दबक्या आवाजात मनातल्या मनात रडत आहे. शेतकऱ्याला कोरोनामुळे खूब संकटाना तोंड द्यावे लागेले.आता त्याला पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा शेत माल मरत आहे त्याला आशा आहे ती पावसाची .थोड्याफार शेतकऱ्यांकडे स्पिकल ओलतीचे साधन आहे ते ओलीत करीत आहे .पण ज्यांच्या कडे कोरडवाहू शेत आहे ज्यांच्याकडे आणि भरपूर शेतकरी चिंतेत पडले आहेत .त्यामुळे त्यांच्यावर खूब मोठे संकट पडले आहे . शेतकरी राजा निराश आहे . त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ निर्माण झाली आहे. तर कुठे शेतकरी आत्महत्या करत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …