Breaking News

*26 जुन ला झालेल्या 32 लोकांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह* *सावनेर पब्लिक स्कुल मध्ये पार पडलेल्या 32 लोकांच्या कोवीड़ 19 स्वँब टेस्टींग चा अहवाल निगेटिव्ह*

*26 जुन ला झालेल्या 32 लोकांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह*

*सावनेर पब्लिक स्कुल मध्ये पार पडलेल्या 32 लोकांच्या कोवीड़ 19 स्वँब टेस्टींग चा अहवाल निगेटिव्ह*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*


*सावनेर पब्लिक स्कुल सावनेर येथे दि.26 जुन 2020 ला पार पडलेल्या 32 लोकांच्या कोवीड़ 19 स्वँब टेस्टींग चा अहवाल निगेटिव्ह आल्या असुन सद्यातरी सावनेरकर व तालुका वासीयाँकरिता चिंतेचा विषय नही असे खात्रीलायक वु्त्त आहे*


*देशात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने चार प्रयोग लाँकडाऊन व सध्या सुरु असलेल्या पहिल्या चरणातील अनलाँक अशी उपाययोजना करुन सुध्दा देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.*


*आशयातच सर्व बाजारपेठ व व्यवहार सुरु झाल्याने स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागावर अधिकच जबाबदार्या वाढल्या असुन स्थानिक नगर प्रशासन मुख्याधिकारी रवींद्र भेलिवे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 120शिक्षक शिक्षिका व 12 पर्यवेक्षक नियमीत सर्वेक्षण करुण नगरितील नागरिकांच्या आरोग्याची वरच्यावर नोंद घेत आहेत तर प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 प्रभारी चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर,डॉ. संदिप गुजर व त्यांचे सहकारी तालुक्यात येणाऱ्या प्रवासी तसेच सर्वेक्षण तसेच कोरोना विषाणू ची लागन झालेल्यांचा संपर्क येणार्यांवर लक्ष ठेवून त्याच्या योग्य कोवीड़ 19 स्वँब चाचण्या नियमितपणे करुण घेत आहे*


*डॉ भुषन सेंबेकर व डॉ संदीप गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.26 जुन रोजी सावनेर पब्लिक स्कुल येथे पार पडलेल्या कोवीड़ 19 स्वँब टेस्टींग च्या आयोजनात सावनेर शहरात मागील दहा दिवसात बाहेरून आलेले 11,इतर 5 तर तालुक्यातील खापा,बडेगाव, केळवद,पाटनसावंगी इत्यादी प्राथमिक आरोग्य केन्द्रातुन आलेले 16 अश्या एकूण 32 लोकांच्या “स्वँब टेस्टींग” चे नमुने घेण्यात आले होते त्यातील सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले असल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाल्याची माहीती प्राप्त होताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला*
*होत असलेल्या कोवीड़19 चाचण्या जरी निगेटिव्ह येत असतील,कोरोना विषाणूंच्या संपर्कात आलेले रुग्ण झपाट्याने बरे होत असतील तरीही मात्र कोरोना विषाणूंचा प्रभाव मात्र कमी झाला नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक शासन निर्देशित सर्व उपाययोजनांचा अवलंब नियमितपणे करुण स्वताचे व आपल्या परिवाराचे संरक्षण करावे अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …