Breaking News

*वीज बिल पाहून जनसामान्यास भरली धडकी* *साधारण माणसाचे तर कंबरडेच मोडले* *अवाढव्य देयक भरणार तरी कोठून* *जोर धरु कोरोना कालिन तीन महिन्याचे विध्यूत देयक माफ करण्याची मागणी*

*वीज बिल पाहून जनसामान्यास भरली धडकी*

*साधारण माणसाचे तर कंबरडेच मोडले*

*अवाढव्य देयक भरणार तरी कोठून*

*जोर धरु कोरोना कालिन तीन महिन्याचे विध्यूत देयक माफ करण्याची मागणी*

विशेष प्रतिनिधि

खापरखेड़ा/नागपुर कोरोनाच्या संकटात महावितरण कंपनीने सामान्य माणसाला वीज बिल चा अनअपेक्षित झटकाच दिला. तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळेस पाठवल्याने ते पाहून कंबरच मोडले. आता अंधारात राहण्याची पाळी त्यांच्यावर येणार आहे. एवढं वीज बिल भरायचं कसे आणि घर चालवायचे कसे असा प्रश्न त्यांच्या पुढे ओढवला आहे. त्यांचा रोष आता पहावयास मिळत आहे. मार्च ते जून महिन्याचे वीज बिल एकमुस्त देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आला आहे.यामुळे सर्वजण घरातच असल्याने मागील 3 ते 4 महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने संपूर्ण राज्यासह, जिल्ह्यात सोबतच तालुक्यातील परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. बहुतांश लोकांनी दर महिन्याला येणाऱ्या सरासरी वीज बिलाच्या आधारावर त्यांनी वीज बिल भरण्यासाठी रक्कम जोडून ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात बिल हातात आल्यावर ते सरासरी पेक्षा अधिकच आल्याने त्यांचे बजेटच बिघडले. कोरोनाच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. तरी काही लोकांना नौकरी असूनही घरीच बसावे लागले या कारणामुळे त्यांची येणारी आवक बंद झाली. असं असतानाच आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर उद्योगधंदेही ठप्प झाले.  कामच बंद असल्याने अनेक लोकांच उत्पन्नाचं साधनंही हिरावलं गेलं. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच वीज महामंडळाने पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे.


वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रिडींग घ्यायला गेलेच नाहीत. रिंडींग घेतले नसले, तरी महामंडळाने अगदी अंदाजपंचेच बील तयार करुन ग्राहकांना पाठवले आहेत. लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्याचा मेळ आता कसा घालणार हा प्रश्‍न वीज ग्राहकांसमोरील मोठा प्रश्न आहे. आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी 500 रुपये बील येत असेल, तर त्याला 900 रुपये बील आकारले गेले आहे. त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. वीज ग्राहकांच्या याविषयी असंख्य तक्रारी आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता वीज मंडळाचे कर्मचारी विजेचे रिडींग घ्यायला येत आहेत. त्यांच्या कडून सलग 3 महिन्याचे रिडिंगचे बिल जोड़ून आले. त्यामुळे अधिकांश लोकांचे तिप्पट यूनिट वीज वापरल्या गेल्याने त्याचा वीज आकार बिलही वाढला असल्याने लोकांना सरासरी पेक्षा वीजबिल अधिकच आले. ह्या बाबी लोकांच्या लक्षात येत असल्याने त्यांचे वीज मंडळ कार्यालयात चक्र वाढल्या आहेत. समाधान न झाल्यास वाद विवाद वाढण्याची शक्यताही वाढली असून असे झाल्यास प्रकरण पोलीस ठाण्यातही जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. अनुचित घटना घडणार असलयाचीही शक्यता अधिक आहे. महिन्याला शंभर युनिट वीज वापरणाऱ्या व्यक्तीला 3.05 रुपये वीज आकारला गेला आहे मात्र महिन्याला 100 युनिट पेक्षा अधिक 300 युनिट पर्यंत हाच वीज आकार वाढून दुप्पट पेक्षा अधिक म्हणजे 6.95 रुपये इतका आहे आणि 1000 युनिट पर्यंत हा वीज युनिट महिन्याकाठी वापरल्यास 12.50 वीज आकारला जातो. सरासरी वीज बिल ना पाठवत सरळ रिडींग घेऊन तीन महिन्याचे एकसकट वीज बिल आल्याने लोकांना जवळपास दुप्पट विजभरना करण्याची वेळ आली आहे. याचा फटका सर्वच लोकांना बसलेला आहे.

प्रशांत टेंबेकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण खापरखेडा 

ग्राहकांच्या विनंती नुसार त्यांना वीज बिल भरण्यामध्ये त्यांच्या सवलतीनुसार टप्पा ठरवून देण्यात येत आहे. दोन महिन्याचे सरासरी बिल आणि तिसऱ्या महिन्याचे रिडींग नुसार बिल देण्यात आले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …