Breaking News

*योगश्च चित्तरुपेन* *प्रस्तुतकर्ता दिपक येवले* *लेख क्रमांक ५*.

*योगश्च चित्तरुपेन*

 

*प्रस्तुतकर्ता दिपक येवले*


*लेख क्रमांक ५*.

 


महाराष्ट्र न्यूज मीडिया डॉट कॉम. क्रमशः
प्राणायामाबद्दल रोज माहिती पाहत असतो. त्यातला आज पुढील भाग क्रमांक पाच पाहू.
प्राणायामाला सुरुवात करण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे असते. कधीही प्राणायाम सकाळी करणे योग्य असते. सकाळी केलेला प्राणायाम हा आपल्या संपूर्ण शरीरास स्वस्थ, निरोगी व दिवसभर सकारात्मक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते. या सर्व गोष्टी, परमपूज्य प्रातःस्मरणीय योग गुरु स्वामी रामदेव बाबा रोज आस्था चैनल व इतर टीव्ही चैनल वर सांगत असतात. रोज सकाळी सुर्योदया अगोदर नित्यनेमाने उठणे आवश्यक आहे. सुरुवातीला सकाळी उठणे हे थोडे कठीण वाटते. परंतु परमपूज्य प्रातःस्मरणीय स्वामी रामदेव बाबा यांचे म्हनने असे आहे की, कुठलीही सवय करण्यासाठी कमीत कमी 6 दिवसाचा कालावधी लागतो. रोज सहा दिवस जर आपण सकाळी उठलो व प्राणायाम करण्यास सुरुवात केली तर आपण कुठलेही कारण न देता, नियमित सहजपणे त्या सवयीनुसार सकाळी उठू शकतो. मनुष्य शरीरास कमीत कमी सहा तास झोप घेणे आवश्यक आहे. जर रात्री आपण थोडे लवकर झोपलो तर, सकाळी साडेचार पाच वाजता सहजपणे उठता येईल. सकाळी उठल्यानंतर लगेच थोडं कोमट पाणी दोन ते चार ग्लास पर्यंत प्यायला पाहिजे. जास्त पाणी पिल्यामुळे अजीर्ण पण होऊ शकते. सकाळी पाणी पिणे याकरता आवश्यक आहे की आपले पोट स्वच्छ होते, व फ्रेश वाटते. पाणी पिणे सुरू करायच्या अगोदर डॉक्टरांशी संपर्क करावा. पतंजली चिकित्सलया मध्ये डॉक्टर कुठलीही फी न घेता आपणास उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात. पाणी पिणे सुरू करण्या अगोदर आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक असते. ब्रश वगैरे करून शौचास झाल्यानंतर आपण फ्रेश होतो व आपणास पाणी पिल्यानंतर वीस मिनिटानंतर प्राणायाम करता येतो. प्राणायाम करायच्या अगोदर आपले पोट रिकामे असले पाहिजे. प्राणायाम करण्या च्या पूर्वी जेवणापासून कमीत कमी पाच तासाचे अंतर हवे. प्राणायाम हा जर, नदीच्या किंवा तलावाच्या किनारी करत असू तर तो जास्त लाभदायक असतो. या जागी सर्वांनाच प्राणायाम करणे शक्य नसते. मग जेथे खुली जागा आहे. बगीचे आहे. घराचे अंगण आहे. हे ही जर नसले तर आपण आपल्या घरामध्ये पण प्राणायाम करू शकतो फक्त प्राणायाम करताना आपल्याला पुरेसी हवा मिळेल, याची काळजी घ्यावी म्हणजे दारे खिडक्या उघडे ठेवून प्राणायाम केला तर त्याचा जास्त लाभ होतो.

प्राणायाम करण्याच्या जागी कुठलेही प्रदूषण नको. प्राणायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये ताजी हवा जात असते व आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्राणवायू मिळतो. प्राणायाम सुरु करण्या अगोदर थोडे अष्टांग योग पाहणे आवश्यक आहे. ते आपण पुढील लेख क्रमांक सहा मध्ये क्रमशः हा पाहू.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …