*योगश्च चित्तरुपेन*
*भाग 6 प्रस्तुतकर्ता दिपक येवले नागपूर*
महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे लेख क्रमांक साहवा क्रमशः आपण पहात आहोत.
प्राणायाम करण्या अगोदर आपणास अष्टांग योग बक्षद्दल माहिती असने आवश्यक आहे. अष्टांग योग म्हणजे यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी याला अष्टांग योग म्हणतात. यातील पहिले दोन यम व नियम हे प्रथम समजून घेऊ.
यम:- सत्य, अहिंसा, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच प्रकारचे असतात.
नियम:- शोच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहे.
हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. पुढे क्रमशः जेव्हा जेव्हा आपणास या गोष्टी विषया अनुरूप सांगणे,ज्या ठिकाणी आवश्यक असेल, त्या त्या वेळेस वरील विषया बद्दल माहिती देण्यात येईल.
प्राणायाम सुरू करण्यापूर्वी आपण पंचप्राणा बद्दल माहिती घेऊ आणि त्याचे काय कार्य असते ते पाहू. प्राण म्हणजे वायू प्राण आपल्या शरीरामध्ये आपण आईच्या पोटामध्ये असतो तेव्हापासून कार्यरत असते. प्राण पाच प्रकारचे असतात प्राण, अपान, उदान, समान व व्यान.
प्रथम प्राणाबद्दल माहिती पाहू. प्राण हा शरीराच्या कंठ आणि हृदयापर्यंत जो वायू काम करते, त्याला प्राण म्हटले जाते. याचे काम नासिका मार्ग, कंठ, स्वर तंत्र. घसा, अन्ननलिका, श्वसन तंत्र आणि हृदय याची क्रियाशीलता वाढवणे आणि या अवयवास शक्ती प्रदान करणे होय.
अपान हा वायू बेंबीच्या खाली पायाच्या अंगठ्या पर्यंत जो प्राण म्हणजे वायू, कार्यशील राहते त्याला अपान प्राण म्हटल्या जाते.
उदान प्राण हा कंठाच्या वर डोक्यापर्यंत आपल्या शरीरामध्ये जो प्राण असतो, त्याला उदान म्हटले जाते. याचे कार्य कंठा च्यावर शरीराच्या समस्त अवयव जसे डोळे, नाक, संपूर्ण मुख् मंडळ याला शक्ती व ऊर्जा प्रदान करणे आणि चेहऱ्यावर तेज निर्माण करणे हे याचे काम आहे. पीच्युटरी आणि पीनियल ग्रंथि सहित पूर्ण मस्तिष्क मध्ये हा उदान प्राण क्रियाशीलता प्रदान करत असते.
यापुढील दोन प्राणाबद्दल माहिती लेख क्रमांक सात मध्ये क्रमशः पाहू. काय