*आमदार श्री. दादाराव केचे यांनी केली विद्युत बिलांची होळी*

*अवाढव्य देयक आल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट*
*विशेष प्रतिनिधी पंकज रोकडे*
आर्वी– महाराष्ट्र वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील जनता त्रस्त झालेली. जनतेला महावितरण कंपनीने अवास्तव बिले विद्युत ग्राहकांच्या माथी मारल्यामुळे कंपनीच्या विरोधात जनतेमध्ये भयंकर रोष उत्पन्न झाला आहे. बिला संबंधित तोडगा काढण्यासाठी *आमदार श्री. दादाराव केचे* यांनी महावितरणचे *कार्यकारी अभियंता मोहड, आष्टी उपअभियंता खडसे, कारंजा उपअभियंता राजुरकर, पुलगाव उपअभियंता पुरी, खरांगणा उपअभियंता देशपांडे, आर्वी शाखा अभियंता दातीर* यांच्या सोबत आर्वी येथील रेस्ट हाऊस मधे बैठक घेतली.

बैठकीत *आमदार श्री. दादाराव केचे* यांनी टाळेबंदी जाहीर झालेल्या काळातील संपूर्ण *ग्राहकांचे विद्युत देयके पुर्णपणे माफ करण्याची रास्त मागणी केली.* यावर विद्युत देयके माफ करने हे शासनाच्या धोरणात्मक बाबी मध्ये येत असल्याने विद्युत देयके माफ करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र विद्युत देयकाचे तिन टप्प्यात वसुली व्याजासकट करण्यात येईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर *आमदार श्री. दादाराव केचे* यांनी टप्पे पाडण्याची गरज नसून विद्युत देयके पुर्णपणे माफ करण्याची आग्रही मागणी केली. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हि बाब अमान्यच केली.

महावितरणचे अधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात आर्वी विधानसभा क्षेत्रातील एकाही ग्राहकाचे मिटर रिडिंग घेतले नाही. आता टाळेबंदीला थोडी उसंत भेटता क्षणी ग्राहकांना अमाप बिले पाठवली. टाळेबंदीमुळे जनता आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आली आहे. अशात महावितरणने पाठवलेली बिले भरणार कशी? असा सवाल *आमदार श्री. दादाराव केचे* यांनी केला तरीही शासनाच्या दावनीला बांधलेल्या अधिकाऱ्यांवर काहीच फरक पडत नाही असे दिसता क्षणी महावितरणने ग्राहकांना दिलेल्या विद्युत देयकांची होळी *आमदार श्री. दादाराव केचे* यांनी करत महावितरणचा आणि शासनाचा निषेध नोंदविला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे *आर्वी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक जगन गाठे, आर्वी नगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश गुल्हाने, संजय थोरात, राहुल गोडबोले, सुनिल बाजपेयी यांच्यासह अनिल जोशी, डॉ. श्यामसुंदर भुतडा, प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका, विष्णू सवई, राजाभाऊ गिरधर, श्याम काळे, नारायण लोंढे, विनय डोळे, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष भाजयुमो आर्वी तालुका, स्वप्नील कठाळे, मयुर पोकळे अध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर, प्रविण पवार, रवी गाडगे, मनोज तळेकर, राजाभाऊ वानखेडे, रणजित काटकर, मनिष उभाड, अश्विन शेंडे, दत्ता बोबडे, सचिंन्द्र कदम, नंदूभाऊ थोरात, रणजित घोडमारे, दिनेश लायचा यांच्यासह अनेक नागरिकांनी शासनाचा व महावितरणचा तिव्र निषेध नोंदवला.*
Maharashtra News Media सच की आवाज