*आम आदमी पार्टी चंद्रपुर तफेँ विद्मूत कार्यालय बाबूपेट येथे आंदोलन* *200 युनिटपर्यंत मागील ४महिण्याचे विज बिल पुर्णपणे माफ करावे*

*आम आदमी पार्टी चंद्रपुर तफेँ विद्मूत कार्यालय बाबूपेट येथे आंदोलन*

*200 युनिटपर्यंत मागील ४महिण्याचे विज बिल पुर्णपणे माफ करावे*

कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे 200 युनिटपर्यंत मागील 4 महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पक्ष चंद्रपुर तर्फे विद्युत कार्यालय, बाबुपेठ येथे आज सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.

या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारच्या पॅकेज सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे. या साठीचे मागणी पत्र स्थानिक विद्युत अभियंता यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे नावे पत्र देण्यात आले.
“शिवसेनेने निवडणुकीत तब्बल 300 युनिट पर्यंतचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते, 100 युनिट पर्यंत माफी विषयी उर्जा मंत्री बोलत होते, ते आश्वासन पाळलेलेच नाही पण किमान या संकट काळात तरी त्याची आठवण ठेवत सामान्य जनतेचे वीज बिल माफ करावे” अशी मागणी आप चंद्रपुर महानगर आणि जिल्ह्यतिल कार्यकर्ते व जनता यांनी मागणी केली आहे.

दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून 200 युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे. त्याचा दिल्लीवासीयांना मोठा दिलासा मिळत आहे. दिल्लीत हे शक्य आहे तर महाराष्ट्रात किमान लॉकडाऊन काळातील चार महिन्यांचे 200 युनिट पर्यंतचे वीज बिल महाराष्ट्र सरकारने माफ करावे. चंद्रपुर मध्ये सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, परमजीतसींगं झगडे (जिल्हा संघटनमंञी), संतोष दोरखंडे (जिल्ह्य सचिव), भिवराज (सोनी कोषाध्यक्ष) , राजेश चेडगुलवार (आप शोशल मीडिया चंद्रपुर जिल्हा प्रमुख) देवकीताई देशकर,योगेश आपटे, प्रशांत येरणे , सुनील रत्नाकर भोयर ,दिलीप तेलंग,संदिप पिंपळकर, .अजय डुकरे ,राजू कुडे, शंकर धुमाळे ,अशोक आनंदे ,शाहरुख शेख ,बबन कृष्णपल्लीवार, शाईनजी शेख, संगीता मेश्राम , विशाल भाले , अनुप तेलतुंबडे , बाबाराव खडसे , महेश सिंग, विनोद कुडकेलवार ,कपील मडावी, रशीद शेख ,राहुल बावणे , सुशांत धकाते शंकर धुमाळे, रामदास पोटे आदी कार्यकर्ते व जनता विजबिल माफी आंदोलनात सामील झाले होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …