*योगश्च चित्तरुपेन*
*प्रस्तुतकर्ता दिपक येवले नागपूर*
*लेख क्रमांक सात*
आपण मागच्या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची अशी, पंचप्राणा बद्दल माहिती पाहत होतो. त्यातले तीन प्राणबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. पुढे उर्वरित दोन प्राणची माहिती पाहू.
समान:-आपल्या शरीरास हृदया पासून नाभीं पर्यंत क्रियाशील ठेवण्याचे काम समान प्राण करते.
समान प्राणाचे मुख्यत्वेकरून आपल्या शरीरामध्ये असलेले संपूर्ण पाचन तंत्राची आंतरिक कार्य प्रणालीला नियंत्रित ठेवण्याचे आहे. यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, अग्नाशय, इत्यादी.
व्यान:- प्राणशक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. संपूर्ण शरीराच्या ज्या गतिविधी आहे, त्याला नियमित व नियंत्रित करण्याचे काम व्यान करत असते. शरीराच्या सर्व अवयवातील मास पेशी, सांधे, शरीरातील नसनाड्या या सर्वांना उर्जा आणि शक्ती देण्याचे काम व्यान प्राण करत असते.
याच्या व्यतिरिक्त पण उपप्राण पाच प्रकारचे असतात जेव्हा आपल्याला याचे काम असेल त्यावेळेस या उप प्राणा बद्दल पण चर्चा करू. यामध्ये देवदत्त. नाग, कृन्कल आणि धनंजय या प्रकारचे पाच उपप्राण आहेत. जे शरीरामध्ये क्रमशः शिंकणे, डोळ्याच्या पापण्या हलवणे, जांभळी देणे, शरीरामध्ये कुठेही खाज येणे, उचकी लागणे इत्यादी, क्रिया चे संचालन करते. हेच प्राण आपल्या शरीराला शुद्ध निरोगी आणि कुठल्याही प्रकारचा रोग न होऊ देन्याचे प्रमुख काम करते.
म्हणूनच प्राण चे सर्वाधिक महत्त्व आपल्या शरीरासाठी उपयोग आहे. प्राणायामचा अभ्यास सुरू करण्याअगोदर, याची पृष्ठभूमि पाहणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे प्राणायाम रुपी प्राण साधना सुरु करण्या अगोदर प्राणाशी संबंधित वरील गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हे समजणे आवश्यक पण आहे. आपल्या शरीरामध्ये पंचकोश स्थित असते. याला पंच शरीर पण म्हटल्या जाते.
अन्नमय कोश, प्राणमय कोष, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश याची माहिती लेख क्रमांक 8 मध्ये क्रमशा पाहू. अशाच प्रकारची खूप माहिती आपल्याला या क्रमशः लेखांमध्ये पाहायची आहे यापैकी बरीच माहिती ही साधारण साधकाला नसते.