Breaking News

*नाल्याजवळील हिरवे गवत खाणे चार गायींच्या जीवावर बेतले* *शेतमालकावर गुन्हा दाखल*

*नाल्याजवळील हिरवे गवत खाणे चार गायींच्या जीवावर बेतले*

*शेतमालकावर गुन्हा दाखल*

प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे नरखेड तालुका सोबत पवन कंळबे जलालखेडा
नरखेड़तालुकांतर्गत मौजा मोहदी (दळवी) शिवारात नाल्या शेजारी असलेले हिरवे गवत खाण्यासाठी तक्रारकर्त्याने चार गायी तेथे बांधल्या. ठेक्याने केलेल्या शेतातून तक्रारकर्त्याच्या शेतात जाण्याचा मार्ग आहे. त्यावरून गायी वासरांची ने-आण करण्याच्या कारणावरून तक्रारकर्ता व शेतठेकेदार यांच्यामध्ये नेहमीच वादग्रस्त खटके उडायचे. त्यावरून सदर शेतठेकेदारानेच त्या हिरव्या गवतावर कीटकनाशकाची हेतुपुरस्सर फवारणी केल्यामुळे तीन गायींचा नाहकच मृत्यू झाला तर एका गायीच्या तोंडातून फेस येऊन तिचाही मृत्यू होण्याची शक्यता वर्तविल्या जाते. तक्रारीन्वये नरखेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४२९ व ३४ भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर व्रुत्त असे की, तक्रारकर्ता रवींद्र पांडुरंग डोंगरे (वय ५०) रा. नरखेड यांची वडिलोपार्जित ८ एकर शेती मौजा मोहदी (दळवी) शिवारात आहे. त्यापैकी तो ४ एकर शेतीची मशागत करतो. तर उर्वरित ४ एकर शेती त्याचा थोरला भाऊ पुरुषोत्तम डोंगरे ने विठ्ठल रेवतकर ला ठेक्याने दिली. रवींद्र चा शेतात जाण्याचा रस्ता पुरुषोत्तमच्या शेतातूनच आहे. पण सदर शेती ठेकेदार व रवींद्र यांच्या शेतमार्गावरून गायी वासरे ने-आण करण्याच्या कारणास्तव नेहमीच वाद व्हायचा. यात शेती ठेकेदार व त्याची मुले रविंद्रला नेहमीच धमकावीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२८ जूनला सायंकाळी रवीन्द्र डोंगरे याने आपल्या ४ गायी शेताशेजारी नाल्याजवळ हिरवे गवत खाण्यासाठी बांधल्यात व वासरे गोठ्यात बांधली. नंतर तो घरी निघून गेल्यावर रात्रीला त्याचा मुलगा हेमंत गायींचे दूध काढण्यासाठी शेतात गेला असता, बांधलेल्या ४ गायींपैकी ४ गायींचा हिरवे गवत खाऊन मृत्यू झाल्याचे आढळले.चौथ्यी गाय हि काही वेळानी मरण पावली (अंदाजे किंमत ३० हजार रुपये) तर एका गायीचे तोंडातून फेस निघत होता. 


याप्रकरणी रवींद्र डोंगरे यांनी २९ जूनला नरखेड पोलिसात तक्रार नोंदवून शेती ठेकेदार व त्याच्या मुलांवर गो-हत्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली. त्यानुसार मृत गायींचे नरखेड पशुवैद्यकिय दवाखान्यात डॉ. महेंद्र चव्हाण यांनी शवविच्छेदन केले व नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे कळते. तक्रारीन्वये पोलिस शिपाई भुजंग बन्सोड यांनी शेती ठेकेदार व संबंधितांवर ४२९ व ३४ भा. द. वी. न्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. 

याप्रकरणी शवविच्छेदनाचे नमुन्यांचा नागपूर वैद्यक प्रयोगशाळेतून काय अहवाल येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे विशेष ! 

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …