*रामटेक तालुक्यात सापडला दुसरा रुग्ण पॉजिटिव्ह.*
*रामटेक वासीयांमध्ये भीतीचे सावट*
नगरधन प्रतिनिधी -पंकज चौधरी
नगरधन- येथे पहिला कोरोना रुग्ण सापडता लगेच रामटेक तालुक्यातील बाजार हिवरा या गावात दुसरा कोरोना रुग्ण आढळल्याची बातमी ऐकायला आली आहे..या बातमीमुळे सम्पूर्ण रामटेक तालुका हादरून गेला आहे.यानंतर आणखी किती रुग्ण सापडतील याचा अंदाज धरणे शक्य नाही. बाहेरून आलेल्या लोकांमुळे रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे अशी मनात शंका वाटत आहे..सदर व्यक्ती हा हिवरा बाजार येथील रहिवासी आहे,व तो व्यक्ती मुंबईवरून आलेली आहे.तसेच हा व्यक्ती आतापर्यंत कुणाकुणाच्या संपर्कात आला आहे याचे तपास घेणे सुरू आहे..आरोग्य विभागाची पूर्ण टीम घटनास्थळी पोहचून तपास सुरू केलं आहे..व पूर्ण परिसर सील केलं असून तेथील ग्रामवासीयांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.पोलिसांची आणि आरोग्य विभागाची पूर्ण टीम सर्व लोकांची तपास करत आहे…