Breaking News

*हिवरा बाजार येथे कोरोणाची लागण* *मुंबईहून आलेला इसम निघाला पॉझिटिव्ह*

*हिवरा बाजार येथे कोरोणाची लागण*

*मुंबईहून आलेला इसम निघाला पॉझिटिव्ह*

रामटेक तालुका प्रतिनिधी-

रामटेक-  तालुक्यात ग्रामीण भागात कोरोणाची लागण झाली असून नगरधन पाठोपाठ आदिवासी भागातील हिवरा बाजार येथे 36 वर्षीय ईसम पॉझिटिव्ह निघाला.या इसमाला तातडीने प्रशासनाने मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचारार्थ पाठवले आहे.या इसमाच्या संपर्कात आलेल्या स्थानिक लोकांना हिवरा बाजार येथे उच्च प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असून अन्य दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.हिवरा बाजार येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे मुंबई कनेक्शन असून तो व्हाया पुणे दिनांक 29 जून रोजी रामटेक येथे पोहोचला.त्याने सर्व प्रवास कार व आटोरि‌क्षाने केला.या इसमाच्या थ्रोट स्वाबचा नमुना दि.29 जून रोजी घेण्यात आला होता.दिनांक 30 जून 2020 रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने तालुक्यात कोरोणा पॉझिटिव रुग्णांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी दिनांक 27 रोजी नगरधन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला होता.त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरु आहेत.रामटेक तालुक्यात ग्रामीण भागात कोरोणा ची लागण सुरू झाली असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. हिवरा बाजार चे सरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले की सदर व्यक्ती आल्याबरोबर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.प्रतिबंधक सर्व उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत.हिवरा बाजार येथील नागरिकांनी या परिस्थितीत घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी.प्रशासनातर्फे दिलेल्या जाणारया सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …