*लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करा*
*माजी आमदार अमर काळे, यांची मागणी*
*सर्व पक्षीय नेत्यांनी तहसिलदाराच्या मार्फत राज्य शासनिस निवेदन*
*प्रतिनिधी विश्वास बांगरे*
*आर्वी- कोरोना काळात जनतेने मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन करत मागील जवळपास तीन महिन्याचा काळ काढला व याकाळात लोकांचे रोजगार पूर्णतः उद्ध्वस्त झाले मोठ्या प्रमाणात निमशासकीय नोकर्या केल्या रोज मजुरी करणारे सर्व कामगार कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, हमाल, ड्रायव्हर, नाभिक कर्मचारी, बँण्ड व्यवसायिक, पानटपरीचालक आदींना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असतानाच अवास्तव व जास्तीचे वीजबिल आल्याने जनसामान्यांना मोठा धक्का बसला आहे लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे मुलांच्या शाळेची फी कशी भरावी? त्यांच्या शाळेचे पुस्तके व गणवेश कसे घ्यावेत? गेल्या चार महिन्यांची थकित घरभांडे कसे भरावेत? हे सर्व भयान प्रश्न डोळ्यासमोर असताना आणि जनतेला दोन वेळच्या भाकरीचाच प्रश्न असताना वीजबिल भरण्याची सोय मुळीच नसल्याची जनभावना यावेळी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी बोलून दाखविली.*
*कोरोना काळातील बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ काढण्यासाठी धान्य, सिलेंडर, मास्क, औषधी व जीवनावश्यक वस्तूंसाठीही शासनासह सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागला, अशा परिस्थितीत वीजबिलाची जुळवाजुळव व नागरिकांना शक्य नसल्याने वीजबिल माफीची गरज असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.*
*तीन महिन्यांचे युनिट एकत्रित केल्याने व कोरोना संसर्गाच्या नियमांम मुळे प्रत्यक्ष रिडींग न घेता अंदाजे रीडिंग घेत बिलाची रक्कम वाढीव युनिट दरामुळे लागल्याने हा मोठा घोळ झाला असल्याचे यावेळी शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी सांगितले. याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतः ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेणार असल्याचे माजी आमदार अमर काळे यांनी सांगितले याविषयी शासनाने धोरण स्पष्ट होईपर्यंत वीज खंडित करू नये, यासाठी कृती समिती आग्रही आहे.*
*दिलीप पोटफोडे व राजेश शिरगरे यांच्या पुढाकारातून यासाठी वीजबिल माफी कृती समितीच्या नावाखाली विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येत या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व पालक मंत्र्यांना पाठविले.*
*यावेळी आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपाल मरस्कोल्हे, युवा स्वाभिमान पक्षाचे दिलीप पोटफोडे, मनसेचे विजय वाघमारे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख महेश चौधरी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा आर्वी तालुकाध्यक्ष सचिन चातरकर व शहराध्यक्ष अभिजीत काष्टे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, बसपाचे सुनील देशमुख व विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज