*दुचाकीच्या धडकेत कामगार ठार*
*खुरजगाव शिवारातील वळण मार्गावरील घटना*
सावनेर – भरधाव ॲक्टिवाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एक कामगार ठार झाला हा अपघात बुधवारी ता.(1) सकाळी सात वाजताच्या सुमारास केळवद सावनेर महामार्गावर घडला.
मनोहर महादेव ढोके 50 राहणार ढालगाव खैरी असे मृतक कामगाराचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे मनोहर बुधवारी सकाळी कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकी वाहनाने घरून निघाला असता खूरजगाव येथील वळणावरून केळवद सावनेर महामार्गावर येताच समोरून भरधाव येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर रित्या डोक्याला मार लागला ही माहिती मिळताच कंपनीच्या वाहनाने शासकीय आरोग्य केंद्र सावनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले व मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविण्यात आला केळवद पोलिसांच्या वतीने तपास कार्य सुरू आहे कामगार संघटना व कंपनीच्या वतीने मृतकाच्या परिवाराला आकस्मिक मदत देण्यात आली असून परिवाराला इतर लाभ लवकरच मिळून दिले जाईल असे कामगार नेते विजय बसवार यांनी सांगितले *
केळवद सावनेर महामार्गावर अपघाताची ही मालिका सुरूच असते या मार्गावरील असलेले हॉटेल धाबे याचा आडोसा घेऊन मालवाहतुकीची जड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभीच असतात त्यामुळे वाहतूकदारांना हा मार्ग धोक्याचा झाला असून यामुळे बऱ्याच लोकांचे अपघात झाले आहे मात्र याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही त्यामुळे या मार्गावरील वाहतूकदारांना समज देऊन मार्ग मोकळा करावा अशी मागणी संबंधित विभागाला कामगार नेते विजय बसवार व त्यांच्या इतर कामगार प्रतिनिधींनी केली आहे.