*खा.अशोक नेतेंनी वाढदिवसानिमित्त केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली– गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करुन सामाजिक बांधिलकीचा परिचय करुन दिला.
खा.अशोक नेते यांचा आज वाढदिवस होता. हा वाढदिवस कुठलाही बडेजाव न करता कोरोना योद्ध्यांचा सत्कार व वृक्षारोपण करुन साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यानुसार आज सर्किट हाऊस येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांच्यासह आरोग्य, पोलिस व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन खा.अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यात प्रशासनाचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार खा.अशोक नेते यांनी यावेळी काढले. याप्रसंगी भाजप नेते डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी सेमाना देवस्थान परिसर व नगर परिषद प्रांगणात खा.नेते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज