*योगेश्च चित्तरुपेन*
*प्रस्तुतकर्ता दिपक येवले नागपूर*
*भाग क्र. ८*
आपण लेख क्रमांक सात मध्ये आपल्या देहामध्ये स्थित पंच कोशांची नावे पहिलीत. आज आपण त्या पंच कोशाचे कार्य पाहू.
*अन्नमय कोश:-हा कोश पाच भौतिक तत्वाच्या आपल्या शरीराचा प्रथम भाग आहे. व्यवस्थित खानपान आसन, सिद्धि आणि प्राणायाम केल्याने अन्नमय कोशाची शुद्धी होते.
*प्राणमय कोष:-हा कोश, शरीर आणि मनाच्या मधला प्राण आहे. आपल्या शरीरामध्ये श्वास आत घेणे आणि बाहेर काढणे, हे याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. हा शरीराचा दुसरा भाग आहे. यामुळेच आपले ज्ञान अर्जित करणे व नित्यकर्म करणे, हे शरीराचे सर्व कार्य या प्राणमय कोशा मुळेच होत असते. आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाचे आपल्या शरीरामध्ये विघटन करून पाचक रस तयार करणे आणि शरीराच्या आतील ज्या अवयवला ज्या रसाची ची गरज असते, त्या भागांमध्ये आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार ते रस पोहोचवण्याचे कार्य करते. रक्तामध्ये मिसळून त्या
अन्नामधले आवश्यक तत्व वेगवेगळ्या भागांमध्ये वितरित करणे आणि आपल्या शरीरात विविध भागातून रक्तातील विषारी तत्व बाहेर काढणे हे महत्व पूर्ण कार्य करते. नियमित प्राणायाम केल्याने अन्नमय कोशाची कार्यशक्ती वाढते आणि शरीराचे पोषण करण्यास मदत करते.
*मनोमय कोश:-या कोशा अंतर्गत मन, बुद्धी, अहंकार,चित्त असे कर्मेंद्रिये असते ज्याचा संबंध आपण जे आपल्या जीवनात व्यवहार करतो त्याच्याशी असते.
*विज्ञानमय कोश:-सूक्ष्म शरीराचा मनोमय कोश हा पहिला भाग आहे आणि विज्ञान महकोष हा सूक्ष्म शरीरातील दुसरा भाग आहे. जो आपल्या बुद्धीचे ज्ञान वर्धन करणारा आहे. यालाच विज्ञानमय कोश म्हणतात. याचे मुख्य तत्व बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय आहे जो मनुष्य विज्ञानमय कोशला उत्तम प्रकारे समजतो, त्याचे आचार विचार शुद्ध असते. आणि असत्य,भ्रम, मोह, आसक्ती पासून स्वतःला दूर ठेवतो. आणि नेहमी ईश्वराचे ध्यान व नाम करतो. म्हणूनच प्राणायाम नियमित करणे आवश्यक असते.
*आनंदमय कोश या बद्दल माहिती लेख क्रमांक नऊ मध्ये पाहू.