*शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्या..भाजपाची मागणी*
कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे
कोरपना :-चंद्रपूर कोविड१९ कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सद्या मोठ्या संकटात सापडला असतांना विविध बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे ह्यामुळे ह्याचा साहनभूतीने विचार करून शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी करून त्यांना नवीन पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे ह्या प्रमुख मागणीसाठी आज भाजपा अहेरी तालुका तर्फे तहसीलदार अहेरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले,तहसील कार्यालय अहेरी येते मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गुहे साहेब यांनी स्वीकारले..!!
ह्यावेळी भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकूद्री, भाजपा जिल्हा सचिव संदीप कोरेत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार,भाजपा अहेरी तालुका महामंत्री पप्पु मद्दीवार व मुकेश नामेवार सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..