*बेलोना ग्रामपंचायत सदस्य कुनाल काळमेघ यांनी साई मंदिराला दिली मालकी*
*हकाची जमीन दान*
*गंगाधर सीताराम काळमेघ याच्या स्मृती प्रित्यार्थ*
बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के
बेलोना– श्री बाल हनुमान (बंधिस्त हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थ क्षेत्र बेलोना येथील वार्ड क्रमांक 5 मधे उकेशभाऊ चव्हाण माझी जिल्हापरिषद अर्थ व शिक्षण सभापती, राहुल चव्हाण अध्यक्ष भाजयुमो नरखेड तालुका, बेलोना ग्रामपंचायत उपसरपंच लच्छुभाऊ चंदेले, ग्रामपंचायत सदस्य कुनाल काळमेघ ,सदस्या उमाताई सातपुते, पुज्यारी दिलीप दिवाण, नामदेवराव सावरकर याच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
वार्डात कुठल्याच प्रकारचे मंदिर नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य कुनाल काळमेंघ यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यार्थ व वाढदिवसा निमित्त साई मंदिर बांधकामासाठी स्वतःच्या मालकीची जमीन मंदिरासाठी दान दिली आणि त्यामुळे वार्ड क्रमांक 5 तसेच बेलोन्या मधे साई मंदिर नसल्यामुळे आता गावकरी मंडळी याच्यात खुशीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
या भूमिपूजनासाठी राजेंद्र अदासे,विनोद सातपुते, सागर मस्के,अतुल बनाईत ,विजू मानकर,तुकाराम निकाजू,किरण सातपुते,राजू बनाईत,सुभाष बानाईत,प्रकाश काळमेंघ,सतीश दिवाण ,रामेश्र्वर मस्के,भगवणाजी बनकर, पद्माकर काळमेंघ,उमेश नारनवरे,सुरेश सावरकर, गुणवंता दिवाण,सचिन सातपुते,निकु सातपुते,पृथ्वीराज मस्के,सोनू काळमेंघ, राजेश बनईत,स्वप्नील चापेकर,प्रतिष्ठित व्यक्ती आणि युवा तरुण मंडळी तसेच महिलांनी या भूमी पूजनाला मोठ्या उत्साहाने सहभाग दिला साई बाबांच्या गजरात भूमी पूजन पार पडले.