Breaking News

*आर्वी सात दुकाने सील, ५१ जणांवर कारवाई* *मास्कचा वापर न करणाऱ्या दुकानदारवर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ची मोठी कारवाई*

*आर्वी सात दुकाने सील, ५१ जणांवर कारवाई*

*मास्कचा वापर न करणाऱ्या दुकानदारवर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ची मोठी कारवाई*

विशेष प्रतिनिधी-विश्वास बांगरे

आर्वीउपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या आदेशान्वये तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालयाच्या सह पथकांनी बुधवारी सामूहिक कारवाई करून सात दुकाने दोन दिवसांकरिता सील केली. तर मास्कचा वापर न करणाऱ्या ५१ जणांवर कारवाई करून ११ हजार सहाशे रुपये वसूल केले.
संचारबंदी शिथिल केल्यानंतर नागरिक बिनधास्त वावर करीत आहे. अनेक लोक मुखपट्टीचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. शारीरिक अंतरसुद्धा पाळल्या जात नसल्याचे दिसून येते आहे. ही परिस्थिती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्याकरिता पोषक ठरण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेप्रमाणे येथील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या आदेशान्वये तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय, पोलीस विभाग व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहा पथकांच्या माध्यमातून प्रतिबंधक उपायाअंतर्गत तालुक्यात मोहीम राबविण्यात आली. यात पहिल्या दिवशी बुधवारी तालुक्यातील दुकानांची तपासणी करण्यात आली. मार्क्स वापर न करणाऱ्या व शारीरिक अंतराचे पालन न करणाऱ्या ५१ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ११ हजार सहाशे रुपये वसूल केले. तर रेणुका रेडिमेड, श्रीराम बुक डेपो यांच्यासह सात दुकाने दोन दिवसांकरिता सील केले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …