*दक्षिण नागपुरचे माजी आमदार मा.सुधाकर कोहळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*नागपूर विशेष प्रतिनिधी*
नागपुर– दक्षिण नागपूर चे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पतंजलि परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊण त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला*
*भाऊंना शुभेच्छा देण्याकरिता पतंजली महिला प्रभारी सौ. उर्मिलाताई जुवारकर, कार्यालय प्रभारी भावनाताई चौधरी,मिडिया प्रभारी जोत्सनाताई इंगळे, योगशिक्षिका सुरेखाताई नवघरे तसेच बेटी बचाओ-बेटी पढायोच्या संयोजिका अर्चनाताई भांडारकर आदींनी त्यांच्या निवासस्थानी पोहचून पुष्पगुच्छ देवुन जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.*
*सुधाकर भाऊ समाजासाठी एक आदर्श व्यक्ती. ते नेहमी जनतेच्या सेवेतच कार्यरत असतात. सुधाकरभाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा कित्येक वर्षापासुन पतंजलि शी जुडलेला असुन पतंजली बद्दल भाऊंना एक जिव्हाळा आहे. पतंजलीच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊण आपली सहभागीता नोंदवितात.*
*ज्यावेळी त्यांना या पतंजली महिला पदाधिकारी शुभेच्छा द्यायला गेल्यात त्यावेळी भाऊंनी जोत्सना इंगळे मिडिया प्रभारी, नागपूर यांचा सुद्धा जन्मदिवस त्याचदिवशी असल्याने त्यांना बुके देवून शुभेच्छा दिल्यात, यावेळी भाऊंनी जोत्सनाताई यांच्या योग सोबतच समाजकार्याची खुप स्तुती केली,ज्योत्सनाताई सोबतच संपूर्ण नागपूर जिल्हा पतंजलि टिमचे कार्य खरेच प्रशंसनीय असुन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाव्दारे सुरु केलेल्या लाँकडाऊनच्या काळामध्येसुद्धा छान कामगिरी केली अशी स्तुती करत पुढिल आयुष्यासाठी ज्योत्स्ना इंगळे यांना शुभेच्छा देत म्हटले की ज्याप्रकारे भारत देशासह संपूर्ण वीश्वाला योगऋषी बाबा रामदेव यांनी योग व आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा मुलमंत्र दिला त्याच प्रमाणे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात योग पोहचविण्याच्या महान कार्यास मुर्तरुप देणाकरिता प्रदिपजी काटेकर,छाजुरामजी शर्मा,उर्मीलाताई,पंकज बांते,राजेन्द्र जुवारकर व त्यांचे सहकारी आहोरात्र सेवा देऊण आपले कर्तव्य व सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे व अश्या संघटनेशी मी जुडला आहे याचा मला अभिमान आहे असे मत व्यक्त केले*