Breaking News

*आर्वीतील ३६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह*

*आर्वीतील ३६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह*

वर्धा प्रतिनिधि-विश्वास बांगरे

वर्धा :- 25 जूनला पुण्याहून परत आलेली 36 वर्षीय आर्वीतील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉजिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांनी दिली.

ही रुग्ण महिला 11 जूनला पुण्यातील थेरगाव येथे लग्नासाठी गेल्या होत्या. 25 जूनला त्या पुण्याहून परत आल्या. 26 जूनला त्यांना गृह विलगिकरण करण्यात आले. तथापि त्यांना ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यामुळे त्यांना 30 जूनला आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. 1 जूनला त्यांची स्त्राव चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये त्या कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गाडी रुग्णालायत कोरोनाच्या उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
या रुग्णासह जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 18 झाली असून 12 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत तर 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …