*बँक कर्मचार्यांची दबंगगीरी*
*पिककर्ज घेण्यास येणार्या शेतकर्यांचे अवाच्य भाषेत स्वागत*
*बँक आँफ इंडिया साहूर चा प्रकार*
आष्टी प्रतिनिधी पंकज रोकडे
*आष्टीः वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहूर येथील बँक आँफ इंडीया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या दबंगगीरी चा जाच दिवसेंदिवस इतका वाढत चालला आहे की ते कर्जा संबधीत विचारणा करण्यास येण्यार्या शेतकऱ्यांना चक्क अभद्र व अवाच्य भाषेत बोलून हाकलून लावन्याचे कार्य करत असल्याचे उघकीस येत आहे*
*असाच प्रकार बँक ऑफ इंडिया शाखा साहूर येथे घडल्याने खातेधारक व शेतकरी बांधवात शाखा व्यवस्थापन विषयी नाराजी चा सुर पनपत आहे*
*सतत ची नापीकी,निसर्गाचा प्रकोप व सध्यास्थीतीत असलेल्या कोवीड़19 च्या प्रभावामुळे शेतकर्यांच्या शेतमालाला भाव व मागणी नाही शेतमाल घरच्या घरीच पडून याउपर राज्य शासनासह केन्द्र शासन तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना शेतकऱ्यांना यथायोग्य मदत व कर्ज उपलब्ध करुण देण्याचे स्पष्ट दिशानिर्देश असुन ही बँक आँफ इंडिया माहूर शाखेतील व्यवस्थापका सह इत कर्मचाऱ्यांनी दबंगगीचे जनुकाही शिखरच गाठण्याचे प्रयत्न करुण शेतकर्यांनवर आपल्या नौकरशाहीचा प्रभाव टाकून त्यांना हाकलुन लावन्याचा दुर्दैवी प्रयत्न होत असल्याचे उघडकीस येत आहे*
*बँक ऑफ इंडिया साहूरच्या कर्मचाऱ्यांने अरेरावी करत पिक कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आधी या ना त्या कागदपत्राकरिता त्रास द्यायचा आणि शेतकऱ्यांनी जाब विचारले की अरेरावी करायची असाच प्रकार सुरु असुन दि. 30/06/2020 ला साहूर येथील बँकांमध्ये घडला बोरगाव येथील तरुण शेतकरी हरिश भुंबर यांच्याशी घडला आहे.दि.03/06/2020 व 09/06/2020 ला सह्या करण्यासाठी पोहचले तसेच बँकेतून सांगितल्या प्रमाणे 23/06/2020 ला परत त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलावलं परत त्यांनी आणखी एक दिवसांनंतर बोलावलं परंतू नंतर हा शेतकरी शेतीच्या कामामुळे3-4 दिवस बँकेत जाऊ शकला नाही आणि तो दि.30/06/2020 ला बँकांमध्ये गेला असता त्या कर्मचाऱ्यांनी त्यास अपशब्दाचा भडीमार करत हुसकावून लावले*
*बँक ऑफ इंडिया माहूर शाखेतील कर्मचाऱ्यांची दिवसेंदिवस वाढत असलेली अरेरावी मुळे खातेधारकात तिव्र संतापाची लाट उसळत असुन गोरगरिब शेतकरी शेतमजूर व ग्रामीण खातेधारांना अभद्र वागणूक करणाऱ्या बँक कर्मचारी व ज्या व्यवस्थापकांच्या उपस्थितीत घडणार्या प्रकारास उघड्या डोळ्याने बघणार्या शाखा व्यवस्थापकावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज