*परराज्यातील मजूर वरोरा शहरात, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*
प्रतिनिधि- जुबेर शेख सोबत मुजम्मिल शेख
वरोरा– AGIPL अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड ही कंपनी रस्ता बांधकाम करण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातून मजूर कामा करिता घेऊन येत आहेत , त्यांनी त्या कामगारांची कोणतीही तपासनी न करता अलगिकरणात न ठेवता सरळ कामावर रुजू केले जात आहे .यापैकी काही दिवस आधी बिहार मधून आलेलं मजूर वरोरा शहरात भाड्याने घर घेऊन राहत आहे.
AGIPL कंपनीने आणलेलं हे मजूर जुन्या तारीख लिहून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जात आहे जेणेकरून कोणीही चौकशी करण्यासाठी आल्यास अडचण होऊ नये ,.नागरिकांच्या दिलेल्या सूचनेनुसार वरोरा शहरात मटण मार्केट येथे बावणे यांच्या घरी काही परप्रांतीय कामगार येऊन आहे . नगर परिषद व आरोग्य विभागाच्या एक चमू तपासणी साठी गेली असता हे सर्व मजूर फरवरी महिण्यापासून आले असे सांगण्यात आले त्यामुळे आरोग्य विभागाची चमू रिकाम्या हाती परतली . त्यांना पुन्हा रात्री उशिरा तिथे पाठविले असता पुन्हा तेच सांगण्यात आले व त्यां कंपनी च्या अधिकाऱ्यांशी बोलले असता त्यानी असे सांगितले की *उप विभागीय अधिकारी यांना सर्व माहीत आहे असे त्रिपाठी या अधिकारी ने सांगितले* नंतर जेव्हा स्थानिक लोकांनी समोर येऊन सांगितले असता हे माहीत झाले की हे लोक 5 दिवस पूर्वी इथे आले आहे .४/७/२०२० रोजी ८ व्यक्तिना कोर्नटाइन करण्यात आले
*पोलीस विभागाकडे मजूर लोकांची यादी नुसार सर्व कामगार आपल्या गावी गेले असताना हे कामगार येथे कसे*
.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एक गाडी रोज रात्री जाऊन या मजुरांना घेऊन परत येते.लगेच दुसऱ्या दिवशी या लोकांना कामावर रुजू करण्यात येत आहे .याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे . अन्यथा कोरोनाचा प्रसार वेगाने होईल. प्रशासनाला सर्व परिस्थिती ची जाणीव करून दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही.
Maharashtra News Media सच की आवाज