*महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी बाळ गोपाळ यांच्या सोबत वृक्षारोपण करुन केला साजरा*
वरोरा प्रतिनिधि – मूजम्मिल शेख

जिवती – माननीय राज्यमंत्री तथा महाराष्ट्रा राज्याचे लाडके मंत्री शेतकरी, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे दिव्यांग बांधवांचे कैवारी, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जिवती तालुक्यातील प्रहार संघटनेच्या सेवकांनी बाळ गोपाळ यांच्या सोबत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
देशामध्ये कोरोनाचे संकट असून सामान्य जनता आर्थिक तथा मानसिक परिस्थिती ने हतबल झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात परिस्थिती गंभीर असून मा. बच्चू भाऊ कडू यांच्या सूचनेनुसार वाढदिवस उत्साहात साजरा न करता प्रत्येकानी एक वृक्ष लावून साजरा करण्याचे आव्हाहन केले. भाऊंच्या 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून आज जिवती तालुक्यातील पाटागुडा येथे प्रहार सेवकांनी वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला..
Maharashtra News Media सच की आवाज